September 12, 2025 6:02 PM

views 30

धरणांमधला गाळ काढण्याबाबतचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे जलसंपदा मंत्र्यांचे निर्देश

धरणांमधला गाळ काढण्याबाबतचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. मंत्रालयात काल झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी वित्त आणि नियोजन विभागाने केलेल्या सूचना विचारात घेऊन हे प्रस्ताव तयार करावे असंही सांगितलं. पूरनियंत्रणाबरोबरच धरणांची साठवण क्षमता वाढवण्यासाठी गाळ काढणं आवश्यक असल्याचं ते यावेळी म्हणाले.

January 16, 2025 8:02 PM

views 28

गंगापूर, कडावा कालव्यातली गळती कमी करण्याच्या जलसंपदा मंत्र्यांच्या सूचना

नाशिक जिल्ह्यातल्या गंगापूर, कडावा कालव्यातली गळती कमी करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या आहेत.  शेतीसाठी पाण्याचे आवर्तन देतांना जवळपास ६० टक्के पाणी गळतीचे प्रमाण दिसून येत असून गळतीचं प्रमाण ६० टक्यांवरून २० टक्यांवर आणण्यासाठी जिल्हा प्रशासनानं आणि जलसंपदा विभागानं काटेकोर नियोजन करावं असंही त्यांनी सांगितलं.