June 17, 2025 2:38 PM

views 88

दुर्गम आणि आदिवासी भागात २००० वाहन चालक प्रशिक्षण केंद्र सुरू करणार

केंद्र सरकारनं देशाच्या विविध भागात दोन हजार वाहन चालक प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल नवी दिल्लीत एका कार्यक्रमात ही माहिती दिली. देशाच्या दुर्गम आणि आदिवासी भागात ही प्रशिक्षण केंद्र सुरू  करण्यात  येतील, यामुळे तरुणांना आणखी एक कौशल्य आत्मसात करता येईल आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असं गडकरी म्हणाले.  देशात सध्या सुमारे २२ लाख  वाहन  चालकांची आवश्यकता आहे; आणि या प्रशिक्षण केंद्रांमधून कुशल वाहन चालक तयार...

May 30, 2025 7:22 PM

views 64

शाश्वत आणि नैसर्गिक शेतीकडे वळण्याचा बायोचार हा उत्तम मार्ग- नितीन गडकरी

शाश्वत आणि नैसर्गिक शेतीकडे वळण्याचा बायोचार हा उत्तम मार्ग आहे, असं केंदीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. ऍग्रोव्हिजन फाऊंडशनने नागपूर इथं आयोजित केलेल्या बायोचार निर्मिती प्रात्यक्षिक आणि प्रशिक्षण कार्यशाळेत ते आज बोलत होते. पिकांचे अवशेष जाळून तयार केलेल्या कोळशासारख्या पदार्थाला बायोचार म्हणतात.   बायोचारमुळे मातीचा दर्जा सुधारतो, कार्बनचं प्रमाण वाढतं, आणि प्रदूषण कमी होतं. त्यामुळे खतांचा वापर कमी होतो आणि शेतीतील उत्पादन वाढतं. शेतीमध्ये नवनव्या यंत्रांचा वापर केला आणि उत्पादन व...

May 5, 2025 1:50 PM

views 57

सिरपूर कागजनगर इथं ३ हजार ९०० कोटी रुपयांच्या विकासकामांची पायाभरणी

परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी तेलंगणामधल्या सिरपूर कागजनगर इथं ३ हजार ९०० कोटी रुपयांच्या विकासकामांची पायाभरणी केली. तेलंगणातल्या पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचं गडकरी यावेळी म्हणाले.   शेतीच्या विकासासाठी महामार्गालगत अमृत सरोवर विकसित करणार असल्याचं गडकरी यांनी सांगितलं. पुढच्या तीन ते चार वर्षात राज्यात दोन लाख कोटी रुपयांचे रस्ते प्रकल्प सुरू होणार आहेत, यामुळे मुलुगू आणि कोठगुडम जिल्ह्यातून हैदराबादला दळणवळण सुलभ होईल, असंही गडकरी म्हणाले.

March 25, 2025 8:14 PM

views 79

रस्ते अपघातांमध्ये ६० टक्क्यापेक्षा जास्त मृत्यू १८ ते ४५ वयोगटातल्या व्यक्तींचे – मंत्री नितीन गडकरी

देशात रस्ते अपघातांमध्ये होणाऱ्या मृत्यूंपैकी ६० टक्क्यापेक्षा जास्त मृत्यू हे १८ ते ४५ वयोगटातल्या व्यक्तींचे असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत रस्ते सुरक्षाविषय तंत्रज्ञानातील भारत आणि अमेरिकेतल्या भागिदारीविषयक कार्यक्रमात बोलत होते. रस्ते अपघातांमुळे देशाच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनाचं तीन टक्के नुकसान होत असल्याचं ते म्हणाले.    विद्यार्थ्यांना वाहतूक विषयक नियम आणि कायद्यांची माहिती व्हावी यासाठी शाळांनी आपल्या अभ्यासक्...

March 16, 2025 6:55 PM

views 66

विदर्भात धवलक्रांती घडवण्यासाठी मदर डेअरी सहाय्यभूत ठरेल – मंत्री नितीन गडकरी

विदर्भात धवलक्रांती घडवण्यासाठी एनडीडीबी, अर्थात राष्ट्रीय दूध उत्पादन विकास महामंडळाद्वारे संचालित मदर डेअरी सहाय्यभूत ठरेल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे. ते आज नागपुरात मदर डेअरी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्याचं भूमीपूजन करताना बोलत होते.    मदर डेअरीनं आता पशुवैद्यक तज्ञांच्या मदतीनं स्थानिक गाईंच्या चांगल्या वाणांसाठी पुढाकार घेणं आवश्यक आहे, असं ते म्हणाले. दररोज सुमारे १२ ते १५ लिटर दूध देणाऱ्या गाई विकसित केल्या तर महाराष्ट्राला ...

March 7, 2025 10:04 AM

views 69

नागरिकांनी अस्पृश्यता, जातीभेद आणि असमानतेपासून स्वतःला मुक्त ठेवावं – मंत्री नितीन गडकरी

प्रगतीशील समाजाच्या निर्मितीसाठी नागरिकांनी अस्पृश्यता, जातीभेद आणि असमानतेपासून स्वतःला मुक्त ठेवलं पाहिजे असं केंद्रीय मंत्री नीतिन गडकरी यांनी म्हटलं आहे. दिल्लीत लोकमाता अहिल्याबाई होळकर सन्मान संमारंभाला संबोधित करताना गडकरी बोलत होते. कोणालाही श्रेष्ठ किंवा कनिष्ठ मानलं जाणार नाही अशा समानतेवर आधारित समाजनिर्मितीचे लक्ष्य ठेवण्यावर त्यांनी भर दिला. यावेळी आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी समाजाच्या कल्याणासाठी सरकार राबवत असलेल्या अनेक उपक्रमांवर प्रकाश टाकला.

March 1, 2025 6:55 PM

views 67

मजबूत विकासासाठी देशाला आधुनिक तंत्रज्ञानाची गरज – मंत्री नितीन गडकरी

मजबूत विकासासाठी देशाला आधुनिक तंत्रज्ञानाची गरज असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत आयोजित इनोव्हर्स परिषदेत बोलत होते. भारत ही जगातली सर्वात  वेगानं वाढणारी  अर्थव्यवस्था असून यात उद्योग क्षेत्राची भूमिका मोठी आहे, असंही ते म्हणाले.

February 9, 2025 1:09 PM

views 62

विमा, निवृत्तीवेतन आणि शेअर बाजार हे देशाच्या आर्थिक विकासाचे 3 महत्त्वपूर्ण पैलू- नितीन गडकरी

विमा, निवृत्तीवेतन आणि शेअर बाजार हे तीन स्तंभ देशाच्या आर्थिक विकासाचे तीन महत्त्वपूर्ण पैलू असून या माध्यमातून आलेली गुंतवणूक उद्योगव्यवसायांना समृद्ध करु शकते, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. नागपूर इथं झालेल्या गुंतवणूकदार प्रशिक्षण परिषदेत ते काल बोलत होते.   आर्थिक वाढीसाठी आर्थिक साक्षरता महत्वाची असून यामध्ये लोकांना जागृत करण्याची आवश्यकता आहे, वित्त पुरवठ्याचे स्रोत आणि तंत्रज्ञानापेक्षाही विश्वासाहर्ता अधिक महत्वाची असते, असं गडकरी म्हणाले. देशाला आत्मनिर्भर करण...

February 7, 2025 7:24 PM

views 64

देशातली सर्वात मोठी औद्योगिक परिसंस्था विदर्भात तयार होत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांचं प्रतिपादन

देशातली सर्वात मोठी औद्योगिक परिसंस्था विदर्भात, गडचिरोलीला केंद्रस्थानी ठेवून तयार होत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री फडनवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज नागपूरमध्ये ‘अ‍ॅडव्हान्टेज विदर्भ २०२५ औद्योगिक महोत्सवाचं’ उदघाटन झालं. त्यावेळी ते बोलत होते. गडचिरोलीमध्ये होऊ घातलेल्या 'पोलाद क्रांती'चा फायदा या संपूर्ण प्रदेशाला होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. येत्या ५ वर्षांत गडचिरोली हे देशाचं पोलाद उत्पादन केंद्र म्हणून उदयाला येईल, असा ...

January 14, 2025 1:56 PM

views 67

संरक्षण दलाच्या तिन्ही दलाची भूमिका महत्वाची – मंत्री नितीन गडकरी

संरक्षण दलातून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आज सशस्त्र सेना निवृत्त कर्मचारी दिवस साजरा होत आहे. या निमित्त नागपूरच्या वायुुसेनानगर इथं मेंटेनन्स कमांडच्या मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी निवृत्त कर्मचाऱ्यांचा गौरव केला. संरक्षण क्षेत्रात स्वयंपूर्ण होणं आवश्यक असून विश्वशांती आणि अहिंसा प्रस्थापित करण्यासाठी संरक्षण दलाच्या तिन्ही दलाची भूमिका महत्वाची असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. कारगिलच्या सोनमर्ग बोगद्याच्या उद्घाटन प्रसंगी उण...