January 20, 2025 7:44 PM

views 55

मेळघाटमध्ये महिलेची धिंड काढल्याप्रकरणी ५ जणांना अटक

मेळघाटमध्ये एका महिलेला मारहाण करून तिची धिंड काढल्या प्रकरणी ५ आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिली आहे. त्या आज पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होत्या. या प्रकरणी समिती स्थापन करून सविस्तर अहवाल आठवडाभरात आयोगाला सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असं चाकणकर म्हणाल्या. 

July 23, 2024 8:08 PM

views 47

मेळघाटात मध्य प्रदेशाच्या सीमेवर झालेल्या अपघातात तीन प्रवाशांचा मृत्यू

मेळघाटात मध्य प्रदेशाच्या सीमेवर मजुरांना घेऊन जाणारी ट्रॅक्टर ट्रॉली उलटून झालेल्या दुर्घटनेत तीन प्रवाशांचा मृत्यु झाला, तर ११ जण गंभीर झाले. मध्य प्रदेशातल्या खालवा तालुक्यात रोशनी चौकी इथं हा अपघात झाला. भर पावसात स्थानिक प्रशासनानं मदत कार्य सुरु केलं आहे.