March 30, 2025 3:31 PM

views 72

लातूर पोलिसदलातर्फे मॅरेथॉनचं आयोजन

लातूर पोलिसदलाने आज आयोजित केलेल्या एक धाव सायबर सुरक्षेसाठी या मॅरेथॉनमध्ये महाराष्ट्रातल्या धावपटूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.  लातूर जिल्हा क्रीडा संकुलातून तीन किलोमीटर, पाच किलोमीटर  आणि दहा किलोमीटर अशा तीन गटातल्या या दौडीत शालेय विद्यार्थ्यापासून वृद्धांनी  सहभाग नोंदवला. सायबर गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली असून त्याबाबत जनजागृती करण्याच्या हेतूने ही मॅरेथॉन आयोजित केल्याची माहिती लातूर जिल्हा पोलिस अधिक्षकांनी दिली.

January 12, 2025 7:35 PM

views 67

नाशिक मॅरेथॉन स्पर्धेत मुंबईच्या डॉ. कार्तिक जयराज करकेराला विजेतेपद

नाशिकच्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्यावतीनं आज आयोजित  मॅरेथॉन  स्पर्धेत  ४२ किलोमीटर पूर्ण मॅरेथॉनचं  विजेतेपद मुंबईच्या डॉ. कार्तिक जयराज करकेरा यानं  पटकावलं.  कार्तिकनं  ही  मॅरेथॉन स्पर्धा  २ तास २० मिनिटांत पूर्ण केली.  नाशिकच्या   दिंडोरी तालुक्यातल्या  सिकंदर चिंधू तडाखे यानं दुसरा क्रमांक  तर वर्धा जिल्ह्यातला  विक्रम भरतसिंह बंगरिया या धावपटूनं तृतीय क्रमांक पटकावला.    मॅरेथॉननंतर आयोजित समारंभात प्रथम क्रमांक विजेता  डॉ. कार्तिक याला   एक लाख ५१ हजार रूपये,  द्वितीय क्रम...

December 10, 2024 7:18 PM

views 47

भारतीय लष्कराच्या दक्षिण कमान मुख्यालयाने आयोजित विजय दिवस अल्ट्रा मॅरेथॉन

भारतीय लष्कराच्या दक्षिण कमान मुख्यालयाने आयोजित केलेली विजय दिवस अल्ट्रा मॅरेथॉन आज अहिल्यानगर जिल्ह्यात पोहोचली. हिवरेबाजार इथून सरपंच पोपटराव पवार यांच्या हस्ते या मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवून पुढे मार्गस्थ करण्यात आलं. हिवरेबाजार ते अहिल्यानगर किल्ल्यापर्यंतच्या संपूर्ण मार्गावर नागरिक या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. या मॅरेथॉनचा जिल्हास्तरीय समारोप अहिल्यानगर किल्ला परिसरात करण्यात आला.    १९७१च्या भारत पाकिस्तान युद्धातल्या भारतीय सैन्याच्या विजयाचं स्मरण करण्यासाठी आयोजित ४०५ किलोम...

November 10, 2024 11:05 AM

views 67

मतदान जनजागृतीसाठी परभणीत मॅरेथॉनचं तसेच सायकल रॅलीचं आयोजन

स्वीप अंतर्गत मतदान जनजागृतीसाठी परभणी येत्या १४ तारखेला जिल्हास्तरीय मॅरेथॉनचं, तर १७ तारखेला सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे.