December 12, 2025 8:21 PM

views 54

छत्तीसगडमधल्या सुकमा जिल्ह्यात दहा माओवाद्यांचं आत्मसमर्पण

छत्तीसगडमधल्या सुकमा जिल्ह्यात आज दहा माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. यात सहा महिला नक्षलींचा समावेश आहे. या सर्वांवर ३३ लाख रुपयांचं बक्षिस जाहीर करण्यात आलं होतं. माओवाद्यांनी त्यांच्याकडील एके-४७, दोन एसएलआर रायफल, एक स्टेन गन आणि एक बॅरेल ग्रेनेड लाँचर आदी शस्त्रं पोलिसांकडे जमा केली. 

October 26, 2025 7:31 PM

views 45

छत्तीसगडमध्ये कांकेर जिल्ह्यात २१ नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण

छत्तीसगडमध्ये कांकेर जिल्ह्यात आज २१ नक्षलवाद्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. यामध्ये १३ महिलांचा समावेश आहे. या नक्षलवाद्यांनी आपल्याकडच्या तीन एके-४७ रायफल, चार एसएलआर, इतर शस्त्र आणि स्फोटकं पोलिसांच्या ताब्यात दिली.      आत्मसमर्पण करणारे नक्षलवादी बस्तर विभागात विविध ठिकाणी दीर्घ काळ सक्रिय होते, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. 

May 23, 2025 9:16 PM

views 78

गडचिरोलीत चार जहाल नक्षलवादी ठार, तर छत्तीसगडमध्ये ३३ माओवाद्यांचं आत्मसमर्पण

गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुका आणि छत्तीसगड राज्याच्या सीमावर्ती भागातल्या जंगलात आज नक्षलवादी आणि पोलिसांत चकमक झाली. या चकमकीत चार जहाल नक्षलवादी ठार झाले असून त्यात भामरागड दलमचा कमांडरचा आणि एका महिला नक्षलवाद्याचा समावेश आहे. भामरागड तालुका आणि छत्तीसगड सीमेवर कवंडे गावात नक्षलवादी लपून असल्याची माहिती मिळाल्यावरुन संयुक्त शोध मोहिम सुरू केली होती. ही मोहिम सुरू असताना आज सकाळी  नक्षलवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरात सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात चार नक्षलवादी मारले गेल...

April 8, 2025 8:44 PM

views 70

छत्तीसगडमध्ये २२ नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण

छत्तीसगडमध्ये आज २२ नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली. त्यातल्या चौघांवर २६ लाख रुपयांचं बक्षीस होतं. यावर्षी बिजापूर जिल्ह्यात १८० नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली आहे. 

April 7, 2025 7:53 PM

views 84

छत्तीसगडमधे ३१ माओवाद्यांचं आत्मसमर्पण

छत्तिसगडमधल्या दंतेवाडा आणि नारायणपूर जिल्ह्यांमधे मिळून आज ३१ माओवाद्यांनी शरणागती पत्करली.  दंतेवाडा जिल्ह्यातून २६ माओवाद्यांनी शरणागती पत्करली, त्यातल्या तीन माओवाद्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी साडेचार लाखाचं बक्षीस जाहीर केलं होतं.   नारायणपूर जिल्ह्यात पाच महिला माओवाद्यांनी शरणागती पत्करली असून या प्रत्येकीवर एक लाख रूपयांचं बक्षीस होतं. आत्मसमर्पण केल्याबद्दल या माओवाद्यांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचा धनादेश प्रोत्साहन योजनेनुसार देण्यात आला आहे. त्याचबरोबर नक्षल पुनर्वसन धोरणानुसार ...

March 30, 2025 9:05 PM

views 58

छत्तीसगडमधल्या बिजापूर जिल्ह्यातल्या ५० माओवाद्यांचं आत्मसर्पण

छत्तीसगडमधल्या बिजापूर जिल्ह्यातल्या ५० माओवाद्यांनी आज आत्मसर्पण केलं. यात प्रत्येकी ६८ लाख रुपये इनाम असणाऱ्या १४ नक्षलींचा समावेश असल्याचं पोलिसांनी सांगितलं. सैन्य आणि प्रशासनानं दुर्गम खेड्यात केलेल्या सुविधांमुळे प्रभावित होऊन या नक्षलींनी आत्मसर्पण केल्याचं पोलीस अधीक्षकांनी सांगितलं.     या नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणाबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आनंद व्यक्त केला आहे. इतर नक्षलवाद्यांनाही हिंसाचार सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याचं आवाहन शहा यांनी समाज माध्यमावर केलं...