November 8, 2025 9:44 AM

views 93

झारखंडमध्ये माओवादी बंडखोरांशी झालेल्या भीषण चकमकीनंतर सुरक्षा दलांनी मिळवलं मोहिमेतलं मोठं यश

झारखंडमधील पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातील दाट सारंडा जंगलात माओवादी बंडखोरांशी झालेल्या भीषण चकमकीनंतर सुरक्षा दलांना नक्षलविरोधी मोहिमेतलं मोठं यश मिळालं आहे. झारखंड पोलिस आणि केंद्रीय राखीव पोलिस दलांच्या संयुक्त पथकाची काल रात्रीपासून आज पहाटेपर्यंत जराईकेला पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कुलापू बुरू परिसरात माओवाद्यांशी चकमक सुरू होती.   दीर्घकाळ सुरू असलेल्या गोळीबारानंतर, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आजूबाजूच्या जंगल परिसरात व्यापक शोध मोहीम सुरू केली. यामध्ये शस्त्रास्त्रे, दारूगोळा, स्फोटके आणि माओ...

July 18, 2025 8:22 PM

views 53

छत्तीसगडमध्ये झालेल्या चकमकीत ६ माओवादी ठार

छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यात सुरक्षादलांशी झालेल्या चकमकीत ६ माओवादी ठार झाले आहेत. सुरक्षादलांनी त्या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात रायफली जप्त केल्या आहेत. अबुझमाड भागात दुपारी ही चकमक झाली. अजूनही काही माओवादी त्या भागात लपलेले असल्याचा संशय असून त्यांचा शोध सुरु आहे.