December 27, 2025 3:38 PM

views 58

विकसित भारत जीरामजी कायद्याविरोधात आंदोलनाचा काँग्रेसचा इशारा

मनरेगा कायद्या ऐवजी ‘व्हीबी जी राम जी’ हा कायदा आणून केंद्र सरकारने गरीबांच्या पोटावर पाय दिला असल्याची टीका करत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ‘जी राम जी’ विरोधात आंदोलन उभारण्याचा इशारा दिला. नवी दिल्ली इथं आज काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली, त्यात ‘जी राम जी’ कायद्यासह इतर मुद्द्यांवर चर्चा झाली. या पार्श्वभूमीवर खरगे यांनी हे विधान केलं आहे. मनरेगाने ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलला, हा जगातला सर्वात मोठा ग्रामीण रोजगार उपक्रम  होता, दलित, आदिवासी, महिला आणि भूमीहीन नागरिकांना याचा...

December 14, 2025 8:01 PM

views 49

मतदारयाद्यांचं सखोल पुनरिक्षण आणि इतर मुद्द्यांवर काँग्रेसचा नवी दिल्लीच्या रामलीला मैदानावर मेळावा

निवडणूक प्रक्रीयेत गैरप्रकार होत असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. मतदारयाद्यांचं सखोल पुनरिक्षण आणि इतर मुद्द्यांवर काँग्रेसनं आज नवी दिल्लीच्या रामलीला मैदानावर मेळावा घेतला. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांची भाषणं मेळाव्यात झाली. मतचोरी रोखणं सर्वांचीच जबाबदारी असल्याचं खरगे म्हणाले. काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते मेळाव्याला उपस्थित होते. मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाबाबत काँग्रेस संभ्रम निर्माण करत असल्याची टीका भाज...

April 3, 2025 2:45 PM

views 59

राज्यसभेतून विरोधी सदस्यांचा सभात्याग

काँग्रेस अध्यक्ष आणि खासदार मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर भाजपा खासदार अनुराग ठाकूर यांनी काल लोकसभेत जमीन हडपल्याचा आरोप केला होता. या  निषेधार्थ आज विरोधी सदस्यांनी राज्यसभेतून सभात्याग केला. अनुराग ठाकूर यांनी माफी मागावी, अशी मागणी यावेळी त्यांनी केली.   राज्यसभेत अशा प्रकारे कोणाचीही प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करण्यात येऊ नये अशी अपेक्षा राज्यसभा अध्यक्ष जगदीप धनखड यांनी यावेळी व्यक्त केली. त्यांनी आचारसंहिता समितीला या संदर्भात निश्चित पद्धती निर्माण करावी  असं आवाहनही केले.  सभागृहा...

November 18, 2024 7:32 PM

views 62

महायुती सरकारच्या काळात महागाई आणि बेरोजगारीत प्रचंड वाढ-मल्लिकार्जुन खर्गे

महायुती सरकारच्या काळात शेतकरी, कामगार, तरुण, महिला यांचं जगणं कठीण झालं आहे, महागाई आणि बेरोजगारी प्रचंड वाढली आहे, अशी टीका करत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी महाविकास आघाडीला विजयी करण्याचं आवाहन केलं. ते वसई इथं प्रचारसभेत बोलत होते. भाजपा समाजामध्ये फूट पाडण्याचं काम करत असून काँग्रेस जोडण्याचं काम करत आहे, असं खर्गे म्हणाले. भाजपा आणि महायुतीने भ्रष्टाचार करून लुटले आहे, महाविकास आघाडी मात्र दिलेली आश्वासनं सत्ता आल्यावर पूर्ण करेल असं खर्गे यांनी सांगितलं.

November 17, 2024 7:02 PM

views 55

भाजपनं देशात फूट पाडण्याचं काम केलं असल्याची मल्लिकार्जुन खर्गे यांची टीका

पंडित जवाहरलाल नेहरू आणि बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या नेत्यांनी लोकशाहीच्या रक्षणासाठी आपलं आयुष्य वेचलं. पण, भारतीय जनता पार्टीने मात्र देशात फूट पाडण्याचं काम केलं अशी टीका काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज केली. नागपूरजवळ उमरेड इथे प्रचारसभेत ते बोलत होते. राज्यात आता मतदारांना सरकार बदलायचं आहे आणि हे खोटं सरकार पाडायचं आहे, असं आवाहन त्यांनी उपस्थितांना केलं.   त्यानंतर खर्गे यांनी सांगली इथंही प्रचारसभा घेतली. महाराष्ट्रातलं सरकार हे चोरीचं सरकार असल्याची टीका या...

November 15, 2024 1:50 PM

views 55

७ हजार रुपये क्विंटल दराने सोयाबीन खरेदीची मल्लिकार्जून खर्गे यांची घोषणा

महाविकास आघाडी सरकार ७ हजार रुपये प्रति क्विंटल दराने सोयाबीन खरेदी करेल, असं आश्वासन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिलं आहे. पुण्यात काल वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. कांद्याच्या दरासंदर्भात एक समिती स्थापन करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

November 15, 2024 1:52 PM

views 54

सत्तेत आल्यावर शेतकरी आत्महत्या थांबवण्याचं शरद पवार यांचं आश्वासन

सत्ता आपल्याला मिळाली तर राज्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवू आणि त्यांच्या मालाला योग्य किंमत देऊ, असं आश्वासन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काल पुणे इथल्या मविआ उमेदवारांसाठीच्या प्रचारसभेत दिलं. राज्यातल्या महिलांना सुरक्षितता मिळवून देणं, शेतकऱ्यांना आत्महत्यांपासून रोखणं, तरुणांना रोजगार मिळवून देणं हे आपलं उद्दिष्ट असून त्यासाठी मतदारांनी साथ द्यावी असं आवाहनही पवार यांना या सभेत केलं. भाजपाच्या राज्यात सहाव्या क्रमांकावर आलेला महाराष्ट्र पुन्हा पहिल्या क्रमांकावर आणू असं आश्वासनही पवा...

November 14, 2024 6:58 PM

views 48

प्रधानमंत्री मोदी आणि भाजपने महाराष्ट्राच्या जनतेला खोटी आश्वासनं दिली – मल्लिकार्जुन खर्गे

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षावर महाराष्ट्राच्या लोकांना खोटी आश्वासनं दिल्याचा आरोप केला. इगतपुरी इथल्या प्रचारसभेत ते बोलत होते. नागरिकांच्या बँक खात्यांमध्ये १५ लाख रुपये जमा करणं, २ कोटी रोजगार निर्माण करणं इत्यादी आश्वासनं प्रधानमंत्र्यांनी दिली, पण ती पूर्ण केली नाहीत, अशी टीका त्यांनी केली. देशातली सर्व विकासकामं आपल्याच कार्यकाळात झाल्याचा दावा प्रधानमंत्री करतात, पण देशाच्या विकासाचा पाया माजी प्रधानमंत्री दिवंगत पंडित जवाह...

November 13, 2024 8:29 PM

views 60

महायुतीचं सरकार जनतेला खोटी आश्वासनं देऊन फसवणूक करत असल्याची खर्गे यांची टीका

राज्यातलं महायुतीचं सरकार जनतेला खोटी आश्वासनं देऊन फसवणूक करत असल्याची टीका काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज लातूर इथल्या प्रचारसभेत केली. केंद्रातलं भाजपा सरकार शेतमालावर जीएसटी लावून शेतकऱ्यांची लूट करत आहे, सोयाबीन आणि कापसाच्या हमीभावात वाढ केली जात नाही अशी टीका खर्गे यांनी केली. सोयाबीनला ६ हजार रुपये हमीभाव देऊ, असं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिलं होतं. मात्र ते पाळलं नाही, असा आरोप करत महायुतीचं फसवं सरकार उलथून टाकून महाविकास आघाडीला विजयी करा, असं आवाहन ...

November 9, 2024 6:54 PM

views 77

महायुुतीचं सरकार आल्यानंतर राज्यातली प्रशासन व्यवस्था कोलमडली – मल्लिकार्जुन खर्गे यांची टीका

काँग्रेसनं कायमच लोकशाही आणि संविधान यांचं रक्षण आणि संवर्धन केलं आहे, असं काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी अमरावती इथं प्रचारसभेत सांगितलं. विचारावर, तत्वावर, कामावर टीका करावी व्यक्तिगत टीका करु नये, असंही ते म्हणाले.  नरेंद्र मोदींनी खोटी आश्वासनं दिली, शेतकऱ्यांना हमीभाव, महिलांना सुरक्षितता, तरुणांना रोजगार काहीही मिळालं नाही असा आरोप खर्गे यांनी केला. महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर शेतकरी, महिला, युवा यांच्यासाठी कल्याणकारी योजना आणू, असं आश्वासन खर्गे यांनी दिलं.  बाई...