August 28, 2024 1:42 PM

views 42

राज्यातल्या दोन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर

केंद्र सरकारच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांची घोषणा काल करण्यात आली. यंदा देशभरातील ५० शिक्षकांना या पुरस्कारांनं सन्मानित करण्यात येणार आहे; यात महाराष्ट्रातल्या दोन शिक्षकांचा समावेश आहे. गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील आदिवासीबहुल जाजावंडी इथल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षक मंतय्या बेडके; तसंच कोल्हापुरातील स. म. लोहिया माध्यमिक शाळेतील कलाशिक्षक सागर बगाडे यांना यंदाचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या पाच सप्टेंबर रोजी नवी दिल्ली...

August 26, 2024 9:44 AM

views 119

सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

केंद्र सरकारच्या सेवेतल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य सरकारच्या सेवेतल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करायला राज्य मंत्रीमंडळानं आज मंजुरी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज ही बैठक झाली. मार्च २०२४ पासूनच याची अंमलबजावणी होणार असून लाखो कर्मचाऱ्यांना याचा फायदा मिळेल.    शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज देण्याच्या योजनेची व्याप्ती वाढवायलाही मंत्रीमंडळानं मंजुरी दिली. नार - पार - गिरणा नदी जोड प्रकल्पालाही सरकारनं आज मंजुरी ...

August 25, 2024 7:12 PM

views 52

राज्यात जोरदार पावसामुळे विविध धरणांमधून विसर्ग सुरु

राज्यात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु असून बहुतांश धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे.    नवी मुंबई महानगरपालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या मोरबे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली असल्यानं धरणातलं अतिरिक्त पाणी धावरी नदीत सोडलं जाईल, असं नवी मुंबई महानगरपालिकेनं सांगितलं आहे. त्यामुळे धावरी आणि पाताळगंगा नदीजवळच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.     पालघर जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू आहे. सततच्या पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.   नाशिक जिल्ह्यात गंगापूर धरणातून ८ ...

August 25, 2024 1:53 PM

views 41

महाराष्ट्राच्या अनेक भागात संततधार पाऊस

महाराष्ट्रात मुंबईसह अनेक भागात आज संततधार पाऊस सुरू आहे. राज्यातल्या पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट हवामान विभागानं जारी केला आहे. मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे.    राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात, आसाम आणि मेघालय या राज्यांमध्ये अति मुसळधार पाऊस पडणार असल्याचं हवामान विभागानं कळवलं आहे. उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणामध्येही जोरदार पावसाची शक्यता आहे.

August 17, 2024 8:18 PM

views 37

कृषी आणि अकृषी विद्यापीठांसाठीचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

राष्ट्रीय सेवा योजनेचे महाराष्ट्र शासनातर्फे दिले जाणारे कृषी आणि अकृषी विद्यापीठांसाठीचे राज्यस्तरीय पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी चे संचालक, प्राध्यापक डाॅ. महावीरसिंग  चौहान यांना  सर्वोत्कृष्ट कार्यक्रम समन्वयक  म्हणून तर महात्मा फुले कृषी विद्यापीठाला सर्वोत्कृष्ट विद्यापीठ म्हणून २०२२-२३ या वर्षीचे राज्य पुरस्कार जाहीर झाले.

August 17, 2024 2:54 PM

views 46

मुंबई मराठी साहित्य संघाचे ‘नाट्यगौरव सन्मान’ जाहीर

मुंबई मराठी साहित्य संघाचे ‘नाट्यगौरव सन्मान’ जाहीर झाले आहेत. यामध्ये चतुरस्त्र रंगकर्मी पुरूषोत्तम बेर्डे, लेखिका अभिनेत्री डॉ. श्वेता पेंडसे, संगीत नाटकांचे लेखक प्रदीप ओक, ख्यातनाम प्रकाश योजनाकार श्याम चव्हाण, संगीत रंगभूमीवरील नवोदित कलाकार भाग्येश मराठे, डॉ गौरी पंडित, तबलावादक आदित्य पानवलकर, अस्तित्वचे लेखक-दिग्दर्शक स्वप्नील जाधव, आनंद पालव, संतोष भुवड आदी मान्यवरांचा सन्मान होणार आहे. संस्थेचे संस्थापक डॉ. अ. ना. भालेराव यांच्या स्मृतिदिना निमित्त, अध्यक्ष अचला जोशी आणि ज्येष्ठ नटवर्य...

August 16, 2024 7:19 PM

views 50

बांग्लादेशातील अत्याचारांच्या विरोधात पुकारलेल्या बंदला राज्यात हिंसक वळण

बांगलादेशात होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात राज्यात काही धार्मिक संघटनांनी बंद पुकारला होता. त्याला काही ठिकाणी हिंसक वळण लागलं.   नाशिकमध्ये काही दुकानदारांनी बंदला विरोध केल्यानंतर दुकान बंद करण्यावरुन दोन गटात वाद झाला. यावेळी आंदोलकांनी काही दुकानांची तोडफोड केली. यावेळी झालेल्या दगडफेकीत दोन पोलिसांसह काही जण जखमी झाले. पोलिसांनी अश्रुधूराचा वापर करुन परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या नाशिक शहरात तणावपूर्ण शांतता असून संवेदनशील भागात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. &nbsp...

August 15, 2024 6:35 PM

views 39

येत्या दोन दिवसांत महाराष्ट्रातील काही भागात पावसाची शक्यता

येत्या दोन दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून विदर्भात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या कालावधीत मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होईल, असा अंदाज आहे.

August 15, 2024 4:07 PM

views 45

राज्यात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

राज्यात सर्वत्र स्वातंत्र्यदिन उत्साहाने साजरा करण्यात येत आहे.   राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी पुण्यातल्या राजभवनात राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. राज्यपालांनी उपस्थित लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांची भेट घेऊन त्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.         मुंबईत मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. राज्य शासन राज्याचा सर्वांगीण विकास आणि नागरिकांच्या कल्याणासाठी वचनबद्ध आहे. असं मुख्यमंत्री एकनाथ ...

August 13, 2024 8:15 PM

views 59

मराठवाड्यातल्या इनाम आणि देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

मराठवाड्यातल्या खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम आणि देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने  आज घेतला आहे. त्यामुळे या जमिनी ताब्यात असणाऱ्यांच्या मालकीच्या होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बेठकीत हा निर्णय घेण्यात आला. वर्ग दोन च्या जमिनी वर्ग एक करण्याची ही मागणी साठ वर्षांपासून केली जात होती.  या जमिनी धार्मिक संस्थांसाठी किंवा इनाम म्हणून दिल्या गेल्या होत्या.  पशुपालन आणि दुग्धव्यवसाय विकासाला चालना देण्यासाठी विदर्भ आणि मर...