April 15, 2025 7:35 PM

views 49

साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना द्यायच्या FRPबाबतचा निर्णय रद्द

राज्यातल्या साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना द्यायच्या एफआरपीबाबत राज्यशासनानं २१ फेब्रुवारी २०२२ ला जारी केलेला शासननिर्णय रद्द केला आहे. याबाबतचा शासननिर्णय आज जारी करण्यात आला. ऊसाच्या एफआरपीसंदर्भात शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि इतरांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयानं २७ मार्च २०२५ ला दिलेल्या आदेशामुळे २१ फेब्रुवारी २०२२ चा शासननिर्णय  रद्द केला आहे. सध्या ऊसउत्पादक शेतकऱ्य़ांना एफआरपी देण्याबाबत त्या शासननिर्णयापूर्वीची कार्यवाही अंवलंबावी, असं आजच्या शासननिर्णया...

April 15, 2025 7:27 PM

views 13

दिव्यांग युवकांच्या कौशल्य विकास आणि तांत्रिक प्रशिक्षणासाठी सामंजस्य करार

दिव्यांग युवकांच्या कौशल्य विकास आणि तांत्रिक प्रशिक्षणासाठी तीन सामंजस्य करार झाले. यात श्री श्री रुरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, स्नायडर इलेक्ट्रिक इंडिया फाउंडेशन, तसंच व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय यांच्यात त्रिपक्षीय सामंजस्य करार झाला.

April 15, 2025 6:55 PM

views 319

महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ निर्णय…

राज्यातील महानगरपालिकांच्या स्थावर मालमत्ता आणि नगरपरिषदा, नगरपंचायती, औद्योगिक नगरीतील मालमत्ता भाडेपट्ट्याने देण्याच्या नियमांमध्ये एकवाक्यता आणण्यात आणण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्याकरिता नवीन दरांबाबत अधिसूचना काढायला आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.    सुधारित नियमानुसार निवासी, शैक्षणिक, धर्मादाय तसंच सार्वजनिक वापरासाठीच्या मालमत्तांचा भाडेपट्टा दर हा रेडी रेकनरच्या तुलनेत अर्धा टक्के पेक्षा कमी अ...

April 14, 2025 3:20 PM

views 42

राज्यात अवकाळी पावसाचा इशारा

राज्यात अनेक ठिकाणी पुढील दोन ते तीन दिवस अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.    कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज काही ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. सिंधुदुर्ग तसंच पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सातारा,सांगली, सोलापूर जिल्ह्यांना आज आणि उद्या पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.    मराठवाड्यात नांदेड, लातूर, धाराशिव इथंही पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज असून या जिल्ह्यांना ही यलो अलर्ट जारी केला आहे.   विदर्भातही भंडारा, बुलढाणा, चंद्र...

April 12, 2025 12:07 PM

views 30

अमृत भारत स्टेशन्स योजनेमध्ये महाराष्ट्रातल्या 132 रेल्वे स्थानकांचा समावेश

भारतीय रेल्वेच्या 'अमृत भारत स्टेशन' योजनेमध्ये महाराष्ट्रातील एकंदर 132 रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेद्वारे देशभरातीलमहत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचं आधुनिकीकरण करण्यात येणार असून प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.   मुंबईसाठी लवकरच 238 नव्या वातानुकूलित उपनगरीय रेल्वेगाड्या आणण्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. याशिवाय, छ...

April 9, 2025 7:03 PM

views 25

आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी प्रकल्प अहवाल तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

राज्यातली  आरोग्य उपकेंद्र ते संदर्भ सेवा रुग्णालयांपर्यंत असलेल्या विविध आरोग्य संस्थांचं बळकटीकरण करण्यासाठी विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्याचे निर्देश   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असून  हा प्रकल्प आशियाई विकास बँकेच्या सहकार्यानं  'मिशन' म्हणून राबविण्यात यावा, अशा सूचनाही दिल्या. मुंबईत आढावा बैठकीत ते बोलत होते. कर्करोग निदान आणि उपचारासाठी संदर्भ सेवा देण्याबाबत प्रभावी कार्यपद्धती ठरविण्यात यावी, कर्करोगावर केमोथेरपी, रेडिएशन थेरपी या उपचारांचा समावेश असावा, अशा सूचनाही मुख्य...

April 5, 2025 8:46 AM

views 49

राज्यात आज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

राज्यात आज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल तर विदर्भात हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे.  

April 4, 2025 7:29 PM

views 67

५७व्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला संघाला विजेतेपद

ओडिशातल्या पुरी इथं झालेल्या ५७ व्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला संघानं विजेतेपद पटकावलं, तर पुरुष संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. अंतिम सामन्यात दिमाखदार खेळी करत आज महाराष्ट्राच्या महिला संघानं यजमान ओडिशावर २५-२१ असा विजय मिळवला. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघ १०-१० असे बरोबरीत होते. मात्र, दुसऱ्या डावात महाराष्ट्रानं अचूक डावपेच आणि दमदार बचाव करत सामना जिंकला. पुरुष गटातल्या अंतिम सामन्यात रेल्वेच्या संघानं गतविजेत्या महाराष्ट्रावर ३६-२८ असा विजय मिळवला.   

April 3, 2025 8:29 PM

views 64

राज्यात अवकाळी पावसाची हजेरी

राज्याच्या अनेक भागात आज अवकाळी पाऊस झाला.   रत्नागिरीत आज पहाटे अनेक ठिकाणी वीजांसह जोरदार पाऊस पडला. पावसामुळे आंबा-काजूसारख्या पिकांसाठी तो नुकसान झालं आहे.   भंडारा जिल्ह्यात आज सकाळपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होत आहे. तुमसर तालुक्यातल्या पाथरी इथं वीज पडून दोन मजुरांचा मृत्यू झाला.   नागपूर जिल्ह्यात आज सकाळपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली आहे.   अहिल्या नगर जिल्ह्यात बहुतांश भागात जोरदार पाऊस झाला. अ...

April 3, 2025 8:15 PM

views 40

राज्यात ‘फेसलेस नोंदणी’, ‘मुद्रांक नोंदणी’ आणि ‘वन स्टेट, वन रजिस्ट्रेशन’ प्रणाली लागू होणार

महाराष्ट्रात येत्या १ मेपासून  ‘फेसलेस नोंदणी’, ‘मुद्रांक नोंदणी’ आणि ‘वन स्टेट, वन रजिस्ट्रेशन’ प्रणाली लागू होणार असल्याची माहिती   राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते.   एखादी व्यक्ती  नागपूरमध्ये घर घेत असेल तर पुण्याहूनही त्याची नोंदणी करता येईल. यामुळे भ्रष्टाचार कमी होईल, नागरिकांचा वेळ वाचेल आणि डिजिटल प्रक्रियेमुळे महसूल व्यवहार अधिक पारदर्शक होतील. असंही त्यांनी सागितलं.