May 11, 2025 7:31 PM

views 55

११वी प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन आणि केंद्रीय पद्धतीने होणार

राज्यात यंदा अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन आणि केंद्रीय पद्धतीने होणार आहे. येत्या ११ ऑगस्टपासून महाविद्यालये सुरू होणार असून, १५ ऑगस्टपर्यंत प्रवेशाचे सर्व टप्पे पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक संपत सूर्यवंशी यांनी दिली.   प्रवेश प्रक्रियेदरम्यान पालक किंवा विद्यार्थ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून खबरदारी घेतली जात आहे. राज्य सरकारने mahafyjcadmissions.in हे संकेतस्थळ आणि ८५३०९५५५६४ हा मदत दूरध्वनी क्रमांक दिला आहे.

May 11, 2025 5:05 PM

views 23

Khelo India : महाराष्ट्राच्या खेळाडूंची ७४ पदकांची कमाई

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आघाडी कायम ठेवत ७४ पदकांची कमाई केली आहे.अदिती हेगडेनं आतापर्यंत सहा पदकं मिळवली आहेत. कराडची अस्मिता ढोणे हिनं एकंदर १७० किलो वजन उचलून ४९ किलो गटात सुवर्ण पदक जिंकलं.आकांक्षा व्‍यवहारेनं भारोत्तोलन प्रकारात ४५ किलो गटात सुवर्ण पदक मिळवलं तर टेबल टेनिस मध्ये काव्या भटनं  सलग दुसऱ्या दिवशी सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं.   २७  सुवर्ण, २२ रौप्य आणि २५ कास्य पदकांसह महाराष्ट्र पदक तालिकेत अव्वल स्थानावर आहे. १४ सुवर्ण पदकांसह ३९ पदक मिळव...

May 9, 2025 9:52 AM

views 42

महाराष्ट्रात सायबर सुरक्षेसाठी अत्याधुनिक सुविधा असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

सायबर सुरक्षेसाठी देशातील अत्याधुनिक सुविधा महाराष्ट्रात असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र सायबरच्या आर्टिफिशियल इंटिलिजन्स बॉट आणि सायबर जागरुकता माहितीपटाचं अनावरण काल मुंबईत झालं; त्यावेळी ते बोलत होते. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित हा चॅटबॉट महाराष्ट्र सायबरच्या 1945 या हेल्पलाईनशी जोडला असून सायबर गुन्ह्याबबत तक्रार कशी करावी, यासंबंधीची माहिती या चॅटबॉटमध्ये मिळणार आहे.

May 8, 2025 6:57 PM

views 22

राज्याचं आर्थिक आरोग्य उत्तम असून वित्तीय तूटही कमी असल्याचा वित्त आयोगाचा निर्वाळा

महाराष्ट्र राज्याचं आर्थिक आरोग्य अतिशय उत्तम असून त्याची वित्तीय तूटही कमी असल्याची माहिती १६व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. अरविंद पनगढिया यांनी वार्ताहर परिषदेत दिली. पनगढिया यांनी आज मुंबईत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची भेट घेतली. त्यानंतर ते बोलत होते. मुंबई महानगर प्रदेशाच्या विकासासाठी वाढीव निधीची मागणी राज्याने केली असून या क्षेत्रातल्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी पन्नास हजार कोटी रुपयांचं विशेष वाटप करण्याची विनंतीही राज्य सरकारन...

May 7, 2025 8:20 PM

views 26

Khelo India : महाराष्ट्राच्या नेमबाजांनी पटकावलं सुवर्णपदक

बिहारमधे सुरु असलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडास्पर्धांमधे महाराष्ट्राच्या नेमबाजांनी आज सुवर्णपदक मिळवलं. वेदांत वाघमारेने ५० मीटर थ्री रायफल पोझिशन्स प्रकारात ४५२ पूर्णांक ५ दशांश गुण मिळवून सुवर्णपदक पटकावलं. महिलांमधे प्राची गायकवाडने त्याच प्रकारात ४५८ पूर्णांक ४ दशांश गुण मिळवून सुवर्णपदक मिळवलं

May 7, 2025 7:14 PM

views 28

राज्यात ठिकठिकाणी ‘मॉकड्रिल’

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार आज राज्यात ठिकठिकाणी मॉक  ड्रिल घेण्यात आलं. युद्धजन्य परिस्थिती उद्भवल्यास कमीत कमी वेळेत अधिकाधिक नागरिकांपर्यंत मदत पोहोचवता यावी, तसंच नागरिकांनी घाबरून न जाता स्वतःला सुरक्षित ठेवावं, यासाठी आज ही सराव प्रात्यक्षिकं करण्यात आली.   सिंधुदुर्ग जिल्ह्यात सात ठिकाणी तर रत्नागिरी जिल्ह्यात पाच ठिकाणी ही प्रात्यक्षिकं झाली. रायगड जिल्ह्यात उरणमध्ये झालेल्या मॉक  ड्रिलमध्ये विविध विभागांनी सहभाग नोंदवला. पुणे जिल्ह्यातही अतिसंवेदनशील ठिकाणी सर्व संबंधित यंत्रणां...

May 7, 2025 7:19 PM

views 56

राज्यात अवकाळी पावसाची हजेरी

धुळे शहर आणि परिसरात आज दुपारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. अचानक आलेल्या वादळाने धुळ्यात काही ठिकाणी झाडे पडली आहे. तर लोकांची तारांबळ उडाली.    भारतीय हवामान विभागाकडून पालघर जिल्ह्यात आज आणि उद्यासाठी यलो अलर्ट देण्यात आला होता. त्यानुसार डहाणू, वाढवण भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. काल रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे डहाणू मधल्या अनेक मच्छीमार बोटींचे नुकसान झाले आहे.    नाशिक जिल्ह्यात आज दुपारनंतर जवळपास सर्वच भागात अवकाळी पावसासह गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. अने...

May 5, 2025 7:36 PM

views 64

राज्यात गारपिटीसह अवकाळी पाऊस

राज्यात आज अनेक ठिकाणी गारपिटीसह अवकाळी पावसानं हजेरी लावली.    जालना शहरासह जिल्ह्यात आज वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला आणि काही भागात गारा पडल्या. त्यामुळे आंबा फळपिकासह कांदा बियाणं, उन्हाळी बाजरी, मका आणि इतर पिकांचं नुकसान झालं. मात्र नागरीकांना उकाड्यातून काहीसा दिलासा मिळाला.    नाशिकमध्ये  मनमाड शहराला  गारपिटीसह अवकाळी पावसानं  झोडपून काढलं.    अहिल्यानगर जिल्ह्यातही आज वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला.   त्यामुळे फळबागांचं आणि काढणीला आलेल्या कांद्याचं  नुकसान झालं.  &n...

May 5, 2025 7:11 PM

views 69

कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर ही काळाची गरज – उपमुख्यमंत्री अजित पवार

राज्यात शेती, उद्योग, शिक्षण इत्यादी क्षेत्रांमधे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर ही काळाची गरज बनली असून या क्षेत्रात पुढाकार घेणाऱ्या सर्वांना शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य मिळेल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्र स्थापन करणं आणि इतर क्षेत्रातला एआयचा वापर, याकरता राज्य शासनानं मायक्रोसॉफ्ट उद्योगाबरोबर करार केला आहे, त्याअंतर्गत बारामती इथं आयटीपार्क किंवा इनोव्हेशन सेंटर उभारण्याबाबत आज मंत्रालयात आयोजित बैठकीत पवार बोलत होते. त्यादृष्टीनं कुशल मनुष्यबळ मि...

May 5, 2025 7:11 PM

views 40

अहिल्यानगरमधल्या चौंडी इथं उद्या मंत्रिमंडळाची बैठक

अहिल्यानगर जिल्ह्यातल्या चौंडी इथं उद्या मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दीचं औचित्य साधून ही बैठक चौंडी इथं आयोजित केल्याचं जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं. या बैठकीत जिल्ह्याच्या प्रलंबित प्रश्नांबाबत निर्णय होतील असंही ते म्हणाले.    भाजपच्या जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाच्या इमारतीचं भूमीपूजन उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते होणार आहे.  तसंच अहिल्यानगर शहरातल्या शासकीय विश्रामगृहाच्या इमारतीचं उद्घाटन मुख्यमं...