June 3, 2025 3:23 PM

views 76

कोविड- १९ च्या व्यवस्थापनासाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी

महाराष्ट्र राज्य सरकारनं कोविड-१९ च्या व्यवस्थापनासाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सर्व आरोग्य सुविधांनी इन्फ्लूएंझा-सदृश आजार आणि श्वसनाची गंभीर समस्या असलेल्या ५ टक्के रुग्णांची तपासणी करावी, असे निर्देश दिले आहेत. आरोग्य विभागानं सर्व महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि जिल्हा प्रशासनांना हे निर्देश दिले आहेत. हातांची स्वच्छता, श्वसन संस्थेचं आरोग्य, खोकताना आणि शिंकताना तोंड आणि नाक झाकणं तसंच सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेचं वर्तन याबाबत जनजागृती करणारे उपक्रम राबवण्याचे निर्देश दिले आहे...

May 30, 2025 7:20 PM

views 24

राज्यात विकसित कृषी संकल्प अभियानाला सुरुवात

केेंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या ‘विकसित कृषी संकल्प अभियान’ या देशव्यापी अभियानाला आज पालघर आणि धाराशिव मध्ये सुरुवात झाली.   गावोगावी जावून शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या अनुषंगाने मार्गदर्शन करणं, प्रयोगशील शेतकऱ्यांच्या शेतावर भेटी देणं, शासकीय योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचवणं, आधुनिक कृषी तंत्रज्ञानाविषयी जागरूकता मोहीम राबविणं, हा या अभियानाचा उद्देश आहे. हे अभियान पालघर आणि धाराशिव  जिल्ह्यातल्या ९० गावांमध्ये राबवलं जाणार आहे.    परभणी जिल्ह्यातल्या ताड बोरगाव इथंही विक...

May 30, 2025 7:03 PM

views 33

१ जूनपासून पावसाळी नियंत्रण कक्ष सुरु होणार

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्यावतीनं येत्या १ जूनपासून पावसाळी नियंत्रण कक्ष सुरू करण्यात येणार आहे. मुंबई महानगर प्रदेशात पावसामुळं उद्भवणारी आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी हा  कक्ष २४ तास सुरु राहणार आहे. मंत्रालय, बृहन्मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका आदी आपत्कालीन नियंत्रण कक्षाबरोबर या नियंत्रण कक्षाचा समन्वय असणार आहे. नागरिकांना  टोल फ्री क्रमांक १ ८ ० ० २ २ ८ ३ ८ ४, नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक ० २ २-२ ६ ४ २ ० ९ १ ४ आणि भ्रमणध्वनी क्रमांक ८ ...

May 29, 2025 8:08 PM

views 48

राज्यात ठीकठिकाणी पाऊस

रत्नागिरी जिल्ह्यात वातावरण ढगाळ असून अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत, मात्र जिल्ह्यात पावसाचा जोर आता ओसरल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज सकाळपर्यंत १२ पूर्णांक ८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.  सध्या जायकवाडी धरणात २९ पूर्णांक ७९ शतांश टक्के पाणीसाठा असल्याचं प्रशासनानं कळवलं आहे.    मान्सूनविषयी हवामान खात्याचा अंदाज लक्षात घेत संभाव्य पूरप्रवण क्षेत्र असल्यामुळे घेऊन सांगली जिल्ह्यात राज्य शासनाने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचं पथक तैनात केलं आहे.  जिल्हा आ...

May 29, 2025 7:30 PM

views 118

महाराष्ट्रात विक्रमी परकीय गुंतवणूक

गेल्या आर्थिक वर्षात महाराष्ट्रात १ लाख ६४ हजार ८७५ कोटी इतकी विक्रमी परकीय गुंतवणूक झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिली. ही गुंतवणूक देशाच्या एकूण गुंतवणुकीच्या ४० टक्के इतकी आहे. त्याआधीच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत ही गुंतवणूक ३२ टक्के अधिक आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत २५ हजार ४४१ कोटी इतकी परकीय गुंतवणूक आली. राज्याच्या घोडदौडी अशीच सुरू राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या जनतेचं अभिनंदनही केलं....

May 28, 2025 7:13 PM

views 36

राज्यातल्या विविध देवस्थानांच्या विकासासाठी सुमारे ३ हजार कोटी रुपयांच्या आराखड्याला मान्यता

राज्यातल्या विविध देवस्थानांच्या विकासासाठी सुमारे ३ हजार कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मान्यता मिळाली असून यासंदर्भातले शासननिर्णय नियोजन विभागानं आज जारी केले. यामध्ये तुळजापूर इथल्या तुळजाभवानी मंदिराच्या विकासासाठी १ हजार ८६५ कोटी, मौजे चौंडी इथल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्मृतीस्थळाच्या विकासासाठी ६८१ कोटी, कोल्हापूर मधल्या जोतिबा मंदिराच्या विकासासाठी २५९ कोटी, अष्टविनायक मंदिरांच्या विकासासाठी १४८ कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचा समावेश आहे.       जामखेड तालुक्यात चौंडी इथं ६ मे ...

May 28, 2025 1:10 PM

views 52

महाराष्ट्रात पावासाचा जोर कायम

महाराष्ट्रात गेले तीन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रचंड नुकसान झालं आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पावसामुळे आठ जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्यात तीन, जालना दोन तर मुंबई, रायगड आणि अहिल्यानगर मध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले. मृतांच्या कुटुंबियांना तात्काळ मदत देण्याचे आणि पिकांच्या नुकसानीची भरपाई देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल झालेल्या मंत्रिमंडळा बैठकीत दिले आहेत.    दरम्यान, महाराष्ट्रातल पावसाळ्याची परिस्थिती अजूनही गंभीर आहे. लातूरमध्ये तीन ...

May 27, 2025 3:23 PM

views 60

राज्यात पावसाचा जोर कायम

राज्याच्या बहुतांश भागांत पावसाचा जोर कायम असून बऱ्याच ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. राजधानी मुंबईत आज सकाळपासून ढगाळ वातावरण असून अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी येत आहेत. मुंबई शहर आणि उपनगरात आज मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. विक्रोळी भागात काल संध्याकाळी झाड कोसळून एका युवकाचा मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले. लातूरमध्ये काल संध्याकाळी झाडावर वीज कोसळून दोघे मृत्युमुखी पडले, तर सहा जण गंभीर जखमी झाले.   रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून जोरदार पाऊस आहे आ...

May 26, 2025 3:08 PM

views 38

मदतीसाठी सर्व यंत्रणा सुसज्ज असल्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

मुंबई आणि परिसरात पावसामुळे बाधित झालेल्या परिसरात मदतीसाठी सर्व यंत्रणा सुसज्ज असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातल्या पाऊस बाधित क्षेत्राची पाहणी केल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. मुंबईत अनेक ठिकाणी वेळेआधी तसंच अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. काही ठिकाणी पाणी साचलेल्या पाण्याचा निचरा आता झाला असून वाहतूक सुरळीत सुरू असल्याची माहिती त्यांनी यावेळी वार्ताहरांना दिली.    मुंबईत सध्या नालेसफाई सुरू असून ती लवकरच पूर्ण होईल. ...

May 26, 2025 10:29 AM

views 38

राज्यात जोरदार पावसाची हजेरी

महाराष्ट्राच्या विविध भागात अद्यापही पावसाचा जोर कायम आहे. दरम्यान, नैऋत्य मोसमी पाऊस काल दक्षिण कोकणात दाखल झाला असून, तो यावर्षी नेहमीपेक्षा 10 दिवस आधीच राज्यात दाखल झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या कृषी विभागानं शेतकऱ्यांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. आगामी दोन दिवस पावसाचे असले तरी 27 मे पासून पावसाचं प्रमाण हळूहळू कमी होईल; मे महिन्याच्या शेवटी कोकण वगळता बहुतांश भागात पाऊस विश्रांती घेण्याची शक्यता आहे, त्यामुळे पावसाची अपेक्षा करून शेतकऱ्यांनी कोरडवाहू जमिनीवर पेरणी आणि लागवडीची घाई ...