July 31, 2026 9:00 PM

views 50

राज्यात ‘लॅण्ड टायटलिंग कायदा’ लागू करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा

राज्यात दुबई आणि सिंगापूरच्या धर्तीवर लवकरच ‘लॅण्ड टायटलिंग कायदा’ लागू करणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे. ठाणे डिस्ट्रिक्ट हाऊसिंग फेडरेशन आणि 'ठाणे शहर सोसायटी मंच'तर्फे आयोजित कार्यक्रमात काल ते बोलत होते. असा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरेल असं सांगून ते म्हणाले की, या कायद्यानुसार  मालमत्ताधारकाला डिजिटल प्रॉपर्टी कार्ड मिळेल आणि त्याबरोबर सर्व तपशील उपलब्ध होईल, तसंच  प्रत्येक सदनिकाधारकाला स्वतंत्र ‘व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड’ दिलं जाईल. ...