January 17, 2026 7:23 PM

views 81

मुंबईत पोलिसांसाठी ४५ हजार घरं बांधण्याचा राज्य सरकारचा निर्णय

मुंबई शहर आणि उपनगरातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी ४५ हजार शासकीय निवासस्थानं बांधायला आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. तसंच, शिवडी न्हावाशेवा अटल सेतूच्या टोलशुल्काला आणखी एक वर्षभर सवलत देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. मुंबईत नागरी परिवहन प्रकल्प टप्पा दोनसाठीच्या सुधारित खर्चाला मंजुरी देण्यात आली. राज्यातल्या युवकांना परदेशात रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र व्यापक आंतरराष्ट्रीय गतीशिलता आणि क्षमता संस्था स्थापन करायलाही आजच्या मंत्रिमंडळ बैठ...

December 24, 2025 3:13 PM

views 101

Maharashtra : जिल्हा परिषदेतल्या कंत्राटी आरोग्य सेविकांना नियमित करण्याचा निर्णय

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेल्या आरोग्य सेविकांना नियमित करण्याचा निर्णय  राज्य मंत्रीमंडळानं आज घेतला. कार्यरत आणि सेवानिवृत्त झालेल्या आरोग्य सेविकांना याचा लाभ मिळेल. मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. याशिवाय नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकीत थेट निवडून आलेल्या नगराध्यक्षांना संबंधित सभागृहाचं सदस्यत्व देण्याचा निर्णयही राज्य सरकारनं घेतला आहे. त्यांना मतदानाचा अधिकारही दिला जाणार आहे. यासंदर्भातला अध्यादेश काढायला र...

December 17, 2025 7:52 PM

views 191

राज्य मंत्रिमंडळ निर्णय…

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारी अर्जाबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम ठरवण्यासाठी निवडणूक कायद्यात सुधारणा करायचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत, निवडणूक अधिनियम १९६१ मध्ये सुधारणा करणारा अध्यादेश काढायला मान्यता देण्यात आली.    महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या अधिनियमातल्या तरतुदीनुसार उमेदवारी अर्ज स्वीकारणाऱ्या किंवा स्वीकारायला नकार देणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्याच्या...

August 19, 2025 4:57 PM

views 232

महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ निर्णय…

मुंबईतल्या टाटा मेमोरियल सेंटरच्या एकात्मिक आयुर्वेदिक कर्करोग दवाखाना आणि संशोधन केंद्रात १०० खाटांचं रुग्णालय उभारण्यासाठी मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाने घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक आज मुंबईत झाली. राज्यातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात गट क आणि तांत्रिक संवर्गात २९ दिवस तत्त्वावर कार्यरत १७ कर्मचाऱ्यांची तातपुरती सेवा नियमित करण्याला मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली.