January 8, 2026 3:03 PM

views 163

ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांचं निधन

ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं काल रात्री पुण्यात दीर्घ आजारानं निधन झालं. ते ८३ वर्षांचे होते. भारताच्या पर्यावरण विषयक संशोधन आणि संवर्धन धोरणाला आकार देण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. आपल्या सहा दशकांपेक्षा जास्त वैज्ञानिक कारकिर्दीत, पर्यावरणाबाबत जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले.   माधव गाडगीळ यांनी पुण्यातल्या फर्ग्युसन महाविद्यालयात जीवशास्त्र या विषयात पदवी मिळवली. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून प्राणीशास्त्रात पदव्युत्तर पदवी, आणि १९६९ साली...

December 11, 2024 7:14 PM

views 36

UNEP चा चॅम्पियन ऑफ अर्थ जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांना जाहीर

संयुक्त राष्ट्रांची पर्यावरण संस्था असलेल्या UNEP चा चॅम्पियन ऑफ अर्थ जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांना जाहीर झाला आहे. पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी काम करणाऱ्यांना तसंच, जागतिक हवामान बदल, दुष्काळ आणि जमिनीचा खालावत चाललेला दर्जा याविरोधात काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कारानं सन्मानित करण्यात येतं.

December 11, 2024 9:35 AM

views 46

माधव गाडगीळ यांना ‘चॅम्पियन ऑफ अर्थ’ जीवनगौरव पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांना संयुक्त राष्ट्रांची पर्यावरण संस्था असलेल्या UNEP चा 'चॅम्पियन ऑफ अर्थ' जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी काम करणाऱ्यांना तसंच, जगभरातील वाढतं वाळवंटीकरण, दुष्काळ आणि जमिनीचा खालावत चाललेला दर्जा याविरोधात काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कारानं सन्मानित करण्यात येतं.