July 1, 2025 12:33 PM

views 50

व्यावसायिक वापराच्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत घट

व्यावसायिक वापराच्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत घट झाली आहे. मुंबईत ५८ रुपयांनी किंमत कमी झाली असून आता ती १ हजार ६६५ रुपये झाली आहे.   दरम्यान, नवी दिल्लीत व्यावसायिक एलपीजीच्या किमतीत ५८ रुपये ५० पैशांनी, कोलकातामध्ये ५७ रुपये आणि चेन्नईमध्ये ५७ रुपये ५० पैशांनी घट झाली आहे. घरगुती सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही अशी माहिती इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडनं दिली आहे.a

June 1, 2025 3:09 PM

views 54

व्यावसायिक गॅस सिलिंडर २४ रुपयांनी स्वस्त

देशातल्या १९ किलोच्या व्यावसायिक  गॅस सिलिंडरच्या किंमती २४ रुपयांनी कमी करण्याचा निर्णय तेल विपणन कंपन्यांनी घेतला आहे. आता व्यावसायिक सिलिंडर दिल्लीत १ हजार ७२३ रुपयांना, मुंबईत १ हजार ६७४ रुपये, कोलकाता १ हजार ८२६, चेन्नईत १ हजार ८८१, बंगळुरूत १ हजार ७९६, नोएडा १ हजार ७२३ आणि चंडीगडमधे १ हजार ७४३ रुपयांना मिळेल. याआधी मे महिन्यात व्यावसायिक सिलिंडरच्या किंमती १४ रुपयांनी कमी झाल्या होत्या.

January 1, 2025 1:51 PM

views 52

व्यावसायिक वापराचं गॅस सिलिंडर १५ रुपयांनी स्वस्त, घरगुती वापराच्या सिलिंडरच्या किंमती जैसे- थे

पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक वापराचे गॅस सिलिंडर १५ रुपयांनी स्वस्त केलं आहे. मुंबई आता १९ किलो वजनाचं LPG सिलेंडर १ हजार ७५६ रुपयांना मिळेल. घरगुती वापराचे LPG सिलिंडरच्या किंमतीत मात्र काहीही बदल झालेला नाही. त्यामुळं हे सिलिंडर ८०२ रुपये ५० पैशांना मिळेल.

October 1, 2024 3:22 PM

views 52

एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ

भारतीय तेल कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात अठ्ठेचाळीस रूपये पन्नास पैसे इतकी वाढ केली आहे. या सिलिंडरची किंमत आता एक हजार सहाशे ब्याण्णव रुपये पन्नास पैसे इतकी झाली आहे. तर पाच किलो एलपीजी सिलिंडरच्या दरातही १२ रुपयांनी वाढ केली आहे. आजपासून हे दर लागू झाले आहेत. दरम्यान, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.