July 11, 2025 7:03 PM

views 66

महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक विधानपरिषदेतही आवाजी मतदानानं मंजूर, महाविकास आघाडीचा विरोध

महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक विधानपरिषदेनं आज विरोधकांनी सभात्याग केल्यानंतर त्यांच्या अनुपस्थितीत आवाजी मतदानानं मंजूर केलं. या विधेयकाला काल विधानसभेची मंजुरी मिळाली होती. आज गृहराज्यमंत्री योगेश नाईक यांनी हे विधेयक विधानपरिषदेत मांडलं. हा कायदा नागरिकांच्या संरक्षणासाठी आणला असल्याचं सांगून यामागची सरकारची भूमिका त्यांनी स्पष्ट केली.     शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब यांनी या विधेयकाला विरोध केला. नक्षलवाद, दहशतवादाला डावी किंवा उजवी विचारसरणी नसते. हा ...

March 18, 2025 7:02 PM

views 112

विधानपरिषद पोटनिवडणुकीत पाचही उमेदवारांची बिनविरोध निवड

राज्य विधानपरिषदेच्या पाच जागांसाठीच्या पोटनिवडणुकीत एका अपक्ष उमेदवाराचा अर्ज बाद ठरला आहे. त्यामुळे भाजपाचे संजय केणेकर, दादाराव केचे आणि संदीप जोशी तर राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय खोडके आणि शिवसेनेचे चंद्रकांत रघुवंशी या पाच उमेदवारांची निवड बिनविरोध होणार आहे.

March 17, 2025 3:54 PM

views 106

विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरायचा आज शेवटचा दिवस

राज्य विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरायचा आज शेवटचा दिवस आहे. भाजपकडून संजय केणेकर, दादाराव केचे आणि संदीप जोशी यांनी आज आपले अर्ज दाखल केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय खोडके आणि शिवसेनेचे चंद्रकांत रघुवंशी यांनीही अर्ज भरला. तर अपक्ष उमेदवार उमेश म्हेत्रे यांनीही अर्ज दाखल केला आहे.   ही निवडणूक २७ मार्च रोजी होणार आहे आणि त्याचदिवशी संध्याकाळी ५ वाजता मतमोजणी होईल. आमश्या पाडवी, प्रवीण दटके, राजेश विटेकर, रमेश कराड आणि गोपीचंद पडळकर हे विधानसभेत निवडून आल्यानं रिक्त झालेल्या जाग...

July 5, 2024 7:35 PM

views 76

विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी १२ उमेदवार रिंगणात

विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी मतदान होणार हे आज स्पष्ट झालं. अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी कुणीही अर्ज मागे न घेतल्यानं ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात आहेत. आता १२ जुलै रोजी मतदान होऊन त्याचदिवशी सायंकाळी मतमोजणी होणार आहे.   भाजपकडून पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर आणि अमित गोरखे रिंगणात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे, शिवसेनेकडून माजी खासदार कृपाल तुमाणे आणि भावना गवळी, काँग्रेसकडून प्रज्ञा सातव निवडणूक लढवत आहेत....