August 4, 2026 6:41 PM
10
कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा तुषार सुवीरचा पराभव
कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा तुषार सुवीर याला पात्रता फेरीतच जपानचा शोगो ओगावा याच्याकडून पराभवाला सामोरं जावं लागलं. महिला दुहेरीत आज प्रिया कोंजेंगबाम आणि श्रुती मिश्रा, तर पुरुष एकेरीत कृष्ण प्रसाद गरग आणि पृथ्वी कृष्णमूर्ती रॉय मैदानात उतरतील. पी. व्ही. सिंधू आणि उन्नती हुडा या स्पर्धेत खेळत नसल्यानं महिला एकेरीचं नेतृत्व तन्वी शर्माकडे आहे. भारताचा सात्त्विकसाईराज रांकीरेड्डी खांद्याला दुखापत झाल्यामुळे आणि त्याचा साथीदार चिराग शेट्टीही यंदा स्पर्धेबाहेर आहेत. या महिन्या...