July 16, 2024 11:14 AM

views 42

विमानप्रवास अधिक सुलभ आणि सर्वांना परवडणारा करण्याला सरकारचं प्राधान्य -किंजरापू राममोहन नायडू

विमानप्रवास अधिक सुलभ आणि सर्वांना परवडणारा करणं याला सरकारचं प्राधान्य असून, विमान वाहतूक सर्वदूर नेण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असं केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू यांनी काल नवी दिल्ली इथं सांगितलं. दुसऱ्या आशिया पॅसिफिक मंत्रिस्तरीय परिषदेच्या पूर्वतयारीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.   देशात नागरी विमान वाहतुकीकरिता मजबूत पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी सरकारनं केलेल्या प्रयत्नांची माहितीही त्यांनी यावेळी दिली. विमान वाहतूक क्षेत्राच्या भविष्यासाठी...