May 10, 2025 1:33 PM

views 26

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र पदक तालिकेत अव्वल स्थानावर

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र ६६ पदकांची कमाई करत पदक तालिकेत अव्वल स्थानावर आहे. यात २४ सुवर्ण, २१ रजत आणि २१ कांस्यपदकांचा समावेश आहे. कर्नाटक ३८ तर राजस्थान २१ पदकांसह दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.

March 26, 2025 8:01 PM

views 18

Khelo India: महाराष्ट्राच्या दिनेश बागडेला पॉवरलिफ्टिंगमधे सुवर्णपदक

दिव्यांगांसाठीच्या खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राच्या दिनेश बागडेनं पॉवरलिफ्टिंगच्या १०७ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं आहे. दिव्येश लडानीला रौप्य तर जोगिंदर सिंगला कांस्यपदक मिळालं. ज्येष्ठांच्या ८६ किलो वजनी गटात अरुणमोळी अरुणगिरीला सुवर्ण, प्रभाबेन शियाळला रौप्य तर समीमबेन व्होराला कांस्यपदक मिळालं.

March 25, 2025 3:45 PM

views 31

Khelo India: महाराष्ट्र पदकतालिकेत पाचव्या क्रमांकावर

नवी दिल्ली इथे सुरू असलेल्या खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये महाराष्ट्र पदकतालिकेत पाचव्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्राच्या खात्यात एकूण ३६ पदकं असून त्यात १४ सुवर्ण, १३ रौप्य आणि ९ कास्यपदकांचा समावेश आहे. हरयाणा ९५ पदकांसह पदकतालिकेत अव्वल स्थानावर आहे. 

March 24, 2025 11:02 AM

views 18

Khelo India: पंजाबच्या जसप्रीत कौरची भारोत्तोलनात नव्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद

खेलो इंडिया पॅरा क्रीडा स्पर्धेत काल पंजाबच्या जसप्रीत कौरनं भारोत्तोलनात नव्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. 45 किलो वजनी गटात स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम मोडून तिने शंभर किलोपेक्षा जास्त वजन उचललं. पुरुषांच्या 54 किलो वजनी गटात मनिषनं 166 किलो वजन उचलून नव्या राष्ट्रीय विक्रमासह सुवर्ण कामगिरी केली. जम्मू काश्मीरच्या शीतल देवीनं तीरंदाजीमध्ये सुवर्णपदक पटकावलं.   महाराष्ट्राच्या आदिल मोहम्मद नाझिर अन्सारी यांने तीरंदाजीमध्ये पुरुषांच्या W1 प्रकारात आपलं वर्चस्व कायम राखत आणखी एक सुवर्णपदक ...

March 22, 2025 6:01 PM

views 14

खेलो इंडिया पॅरा गेम्समधे भालाफेकीत महाराष्ट्राच्या भाग्यश्री जाधवला सुवर्णपदक

नवी दिल्लीत जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर सुरू असलेल्या खेलो इंडिया पॅरा गेम्समधे आजच्या तिसऱ्या दिवशी महिला भालाफेकीत महाराष्ट्राच्या भाग्यश्री जाधवला सुवर्णपदक मिळालं. त्यामुळे महाराष्ट्राच्या पदकांची संख्या आता सात झाली आहे.  हरयाणा ९ सुवर्णपदकांसह पदकतालिकेत अव्वल स्थानी असून महाराष्ट्र पाच सुवर्णपदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

March 22, 2025 9:34 AM

views 24

दिव्यांगांसाठीच्या खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राला 3 सुवर्णपदक

नवी दिल्ली इथं सुरू असलेल्या खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत काल महाराष्ट्राच्या खेळाडूंनी 3 सुवर्ण पदकं आणि 1 रौप्य पदक मिळवलं.   अकोल्याच्या चैतन्य पाठकनं 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत, तर कराडच्या साहिल सय्यद आणि पुण्याच्या सिध्दी क्षीरसागरनं गोळाफेकीत सुवर्णपदक पटकावलं.   मीनाक्षी जाधव हिनं गोळाफेकीत रौप्यपदक मिळवलं. बॅडमिंटनमध्ये आरती पाटील आणि सुकांत कदम यांनी आपापल्या गटात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

March 19, 2025 10:31 AM

views 58

खेलो इंडिया पॅरा गेम्स २०२५ च्या शुभंकर, बोधचिन्ह आणि गाण्याचं अनावरण

युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी काल नवी दिल्ली इथे आगामी खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025 च्या शुभंकर, बोधचिन्ह आणि गाण्याचं अनावरण केलं. दिव्यांगांसाठीचे पॅरा गेम्स उद्यापासून 27 मार्चपर्यंत दिल्लीत होणार आहेत. खेलो इंडिया उपक्रमाने सहभागी होऊ शकणाऱ्या खेळाडूंना एक उल्लेखनीय व्यासपीठ दिल्यामुळे जागतिक स्तरावर देशाची प्रतिष्ठा उंचावली आहे.