December 3, 2025 3:20 PM

views 43

खरीप हंगामात ११६ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरच्या पीकाचं नैसर्गिक आपत्तीमुळं नुकसान

देशभरात यंदाच्या खरीप हंगामात ११६ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरच्या पीकाचं नैसर्गिक आपत्तीमुळं नुकसान झाल्याची माहिती केंद्र सरकारनं काल लोकसभेत दिली. २७ नोव्हेंबरपर्यंतच्या या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातल्या सुमारे साडे ७५ लाख हेक्टर क्षेत्रावरच्या पीकांचा यात समावेश आहे. केंद्रीय कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

September 18, 2024 6:53 PM

views 45

यंदाच्या खरीप हंगामात राज्यात कृषी उत्पन्न ३१ लाख मेट्रीक टनांनी वाढण्याची आशा

राज्यात यंदाच्या खरीप हंगामातलं धान्य उत्पादन सरासरीच्या तुलनेत सुमारे ३१ लाख मेट्रीक टनानं वाढण्याची अपेक्षा कृषी विभागाचे मुख्य सांख्यिक वैभव तांबे यांनी व्यक्त केली. राज्यातल्या खरीप हंगामातल्या पिकांना पावसानं दिलेली योग्य साथ आणि अनुकूल हवामानामुळं यंदाचं खरिपातील धान्योत्पादन चांगलं येण्याची आशा आहे. खरीप हंगामाचा पहिला अंदाज हाती आला असल्याचंही त्यांनी सांगितलं.