February 26, 2025 3:21 PM

views 82

Ranji Trophy Final : विदर्भ आणि केरळ यांच्यात विजेतेपदासाठी लढत

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी विदर्भ आणि केरळ यांच्यातल्या अंतिम सामन्याला आज नागपूरमधे सुरुवात झाली. केरळनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. त्यानंतर पहिल्या सत्राच्या खेळात केरळनं अवघ्या २४ धावांमध्येच विदर्भाचे आघाडीचे तीन फलंदाज तंबूत धाडले. मात्र त्यानंतर चौथ्या गड्यासाठी दानिश मालेवार यानं झुंझार शतकी खेळीसह करूण नायर याच्यासोबत दीड शतकी भागिदारी करत विदर्भाचा डाव सावरला. केरळच्या निधीश यानं विदर्भाचे दोन गडी बाद केले.   शेवटचं वृत्त हाती आलं तेव्ह...

January 6, 2025 12:58 PM

views 61

केरळमध्ये बस दरीत कोसळून ६ जणांचा मृत्यू

केरळच्या इडुक्की जिल्ह्यात पुल्लूपाडा इथं राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस चालकाचं नियंत्रण सुटल्यानं दरीत कोसळून अपघात झाला. यात दोन महिलांसह चौघांचा मृत्यू झाला आहे. जखमी झालेल्यांना मुंडक्कयम इथं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ब्रेक निकामी झाल्यानं हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यात तामिळनाडूहून तंजावरच्या सहलीवरून परतत असलेले प्रवासी होते.

December 30, 2024 1:40 PM

views 58

हँडबॉल राष्ट्रीय चँपियन स्पर्धेत वरिष्ठ पुरुषांच्या सामन्यात केरळनं विजेतेपद पटकावलं

वरिष्ठ स्तरावरच्या पुरुषांच्या हँडबॉल राष्ट्रीय चँपियन स्पर्धेत केरळनं चंडीगढचा ३४ - ३१ नं पराभव करत विजेतेपद पटकावले.  हा सामना काल केरळच्या चांगनासेरी मध्ये खेळवला गेला. केरळचा संघ पहिल्यांदाच  या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. उपांत्य फेरीच्या सामन्यात  सैन्यदलाचा पराभव करत केरळचा संघ अंतिम फेरीत पोहोचला  होता तर चंदिगढनं भारतीय रेल्वेच्या संघाचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.

December 2, 2024 1:36 PM

views 51

केरळ, तामिळनाडू आणि दक्षिण कर्नाटकात मुसळधार पावसाचा अंदाज

फेंजल चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली असून, ते आज वायव्येकडे सरकण्याची आणि हळूहळू कमकुवत होण्याची शक्यता आहे. मात्र, या चक्रीवादळामुळं केरळ, तामिळनाडू आणि दक्षिण कर्नाटकात आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. दरम्यान, फेंजल चक्रीवादळामुळं पुद्दुचेरी इथं गेल्या तीस वर्षांतला सर्वात जास्त पाऊस पडल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. ते पूर्वपदावर यायला काही दिवस लागण्याची शक्यता आहे. काल संध्याकाळी पाऊस थांबल्यानंतर  बचाव आणि मदत कार्याला वेग आला आहे. भारतीय लष्कर, राष्ट्रीय आपत्ती प्रति...

October 14, 2024 8:17 PM

views 68

केरळमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये ‘रेड अलर्ट’ जारी

केरळमधल्या कन्नुर जिल्ह्यात ऑरेंज तर इडुकी, मलप्पुरम, कोझीकोड आणि वायनाड जिल्ह्यात हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. इतर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. येत्या काही दिवसांत पावासाचा जोर आणखी वाढेल, असंही हवामान विभागाने कळवलं आहे.

September 27, 2024 8:26 PM

views 80

केरळमधे मंकी पॉक्सचा दुसरा रुग्ण

केरळमधे मंकी पॉक्सचा आणखी एक रुग्ण आढळला आहे. ३८ वर्ष वयाचा हा इसम परदेशातून कोच्चीला परतल्यावर त्याला मंकीपॉक्सची लागण झाल्याचं आढळलं असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. केरळमधे आढळलेला मंकीपॉक्सचा हा दुसरा रुग्ण असून जागतिक आरोग्य संघटनेनं मंकी पॉक्सबद्दल जागतिक स्तरावर आणीबाणी घोषित केली आहे.

September 15, 2024 7:57 PM

views 84

केरळमधील मलप्पुरममध्ये तरुणाचा निपाह विषाणूने मृत्यू झाल्याचं स्पष्ट

केरळमधे मलप्पुरम जिल्ह्यात पेरिंतलमन्ना इथल्या खासगी रुग्णालयात मृत्यू झालेला तरुण निपाह विषाणूबाधित असल्याचं स्पष्ट झालं आहे. पुण्याच्या राष्ट्रीय विषाणूशास्त्र संस्थेनं त्याच्या शरीरातले नमूने तपासल्यानंतर, त्याचा मृत्यू निपाह विषाणूमुळे झाल्याचं स्पष्ट केलं आहे. या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी पावलं उचलली असून, १६ विविध समित्या स्थापन केल्या असल्याचं केरळच्या आरोग्यमंत्री विणा जॉर्ज यांनी सांगितलं.

September 12, 2024 1:15 PM

views 55

केरळ तिरुअनंतपुरम इथं पाच राज्यांच्या अर्थमंत्र्यांची आज बैठक

केरळ राज्यसरकारने पाच राज्यांच्या अर्थमंत्र्यांची बैठक आज राजधानी तिरुवअनंतपुरम इथं आयोजित केली आहे. केरळ खेरीज तमिळनाडू, कर्नाटक, तेलंगण आणि पंजाब या राज्यांचे अर्थमंत्री त्यात सहभागी होणार आहेत. केंद्र – राज्य संबंधांचा आर्थिक पैलू आणि १६ व्या वित्त आयोगात राज्यांना न्याय्य वाटा मिळवण्याच्या दृष्टीनं मोर्चेबंधणी हे या बैठकीचं उद्दिष्ट आहे. माजी केंद्रीय आर्थिक सल्लागार डॉ अरविंद सुब्रमणियन बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत. 

August 7, 2024 11:31 AM

views 72

केरळ आणि आसाम या राज्यांना महाराष्ट्र शासनाकडून प्रत्येकी 10 कोटी रुपयांची मदत जाहीर

केरळ आणि आसाम या पूरस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या राज्यांना महाराष्ट्र शासनानं प्रत्येकी 10 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्य शासनानं काल यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला. केरळ आणि आसाम या राज्यांच्या मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये ही रक्कम जमा केली जाईल.

August 6, 2024 7:33 PM

views 46

केरळ आणि आसामला महाराष्ट्र शासनाकडून प्रत्येकी १० कोटींची मदत

केरळच्या वायनाड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळं दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत जीवित आणि वित्तहानी झाली. या परिस्थितीवर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनानं केरळला १० कोटी रुपयांची मदत दिली आहे. तसंच जुलै महिन्यात आसाम राज्यात पूरस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात हानी झाली. त्यातून सावरण्यासाठी आसामलाही महाराष्ट्र शासनाकडून १० कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे.