July 26, 2025 1:25 PM

views 15

देशभरात करगील विजय दिवस साजरा

देशभर आज कारगिल विजय दिवस साजरा होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज कारगिल विजय दिनानिमित्त देशासाठी बलिदान देणाऱ्या शूर सैनिकांना आदरांजली वाहिली. हा दिवस देशाच्या सैनिकांचं असाधारण शौर्य, धैर्य आणि दृढनिश्चयाचं  प्रतीक आहे, असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.    प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना कारगिल विजय दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. आजच्या दिवशी, देशाच्या आत्मसन्मानाचं रक्षण करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या भारत मातेच्या वीर सुपुत्रांचं आपण स्मरण कर...