July 14, 2025 12:29 PM

views 27

कैलास मानसरोवर यात्रेकरुंची सहावी तुकडी संध्याकाळी सिक्कीमला पोहोचणार

कैलास मानसरोवर यात्रेकरुंची सहावी तुकडी आज संध्याकाळी नाथुला मार्गे सिक्कीमला पोहोचेल. यामध्ये ४५ यात्रेकरू, आणि संपर्क अधिकाऱ्यांसह एकूण ५२ जण आहेत. याशिवाय, गंगटोकमध्ये चार सहाय्यक कर्मचारी आधीच तैनात आहेत. हा जथ्था आज दुपारी साडेबाराच्या सुमाराला बागडोगराला पोहोचेल.

July 2, 2025 1:41 PM

views 28

कैलास मानसरोवर यात्रेकरूंची पहिली तुकडी तीर्थयात्रा पूर्ण करून गंगटोक इथे सुखरूप परतली

कैलास मानसरोवर यात्रा २०२५ च्या यात्रेकरूंची पहिली तुकडी कैलास पर्वत आणि मानसरोवरची तीर्थयात्रा पूर्ण करून काल गंगटोक इथे सुखरूप परतली. ही तुकडी काल दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांनी नथुला इथे पोहोचली.

June 30, 2025 2:39 PM

views 37

कैलास मानसरोवर यात्रा आजपासून सुरू

कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर २०२० मध्ये स्थगित करण्यात आलेली कैलास मानसरोवर यात्रा आजपासून सुरू होत आहे.                                                                                                                                                                                                                                                                              सिक्कीममधल्या नाथुला खिंड आणि उत्तराखंडमधल्या लिपुलेख खिंड मार्गावरून ही यात्रा सुरू होणार असून जून, जुलै आणि ऑगस्टपर्यंत ही या...

June 21, 2025 10:55 AM

views 29

कैलास मान सरोवर यात्रेला सिक्कीम इथून प्रारंभ

कैलास मान सरोवर यात्रेला काल सिक्कीम इथून प्रारंभ झाला. सिक्कीमचे राज्यपाल ओमप्रकाश माथुर यांनी नथु ला मधून जाणाऱ्या 36 यात्रेकरूंच्या पहिल्या तुकडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. नथु ला खिंडीच्या दुसऱ्या टोकाला चीनच्या अधिकाऱ्यांनी यात्रेकरुंचं स्वागत केलं. तिबेटच्या स्वायत्त प्रदेशातली कैलास मानसरोवर यात्रा पाच वर्षांच्या कालावधीनंतर यंदा होत आहे.   

June 14, 2025 1:13 PM

views 36

कैलास मानसरोवरला जाणाऱ्या यात्रेकरूंची पहिली तुकडी गंगटोकला पोहोचेल

कैलास मानसरोवरला जाणाऱ्या यात्रेकरूंची पहिली तुकडी उद्या सिक्कीमची राजधानी गंगटोक इथं पोहोचेल. सिक्कीम सरकारनं यात्रेकरूंच्या स्वागताची सर्व तयारी केली आहे. तब्बल पाच वर्षांनंतर सिक्कीम मार्गे कैलास मानसरोवर यात्रेला प्रारंभ होत आहे.  २० जूनपासून यात्रेला सुरू होणार असून नाथू खिंडीतून रवाना होणाऱ्या यात्रेकरूंच्या पहिल्या तुकडीला मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग हिरवा झेंडा दाखवणार असल्याची माहिती सिक्कीमच्या पर्यटन आणि नागरी उड्डाण विभागाचे अप्पर मुख्य सचिव सी एस राव यांनी दिली. पहिल्या तुकडीत ३५ य...

June 2, 2025 1:28 PM

views 31

सरकार नाथूला मार्गे कैलास मानसरोवर यात्रा सुरु करण्यासाठी सज्ज

सरकार ५ वर्षानंतर नाथू ला मार्गे कैलास मानसरोवर यात्रा सुरु करण्यासाठी सज्ज आहे. यात्रेकरूंचा पहिला गट १५ जूनला गंगटोक इथं दाखल होईल. यात्रेकरूंचे १० गट यात्रेला जाणार असून प्रत्येक गटात ४८ यात्रेकरू असतील. सुमारे २१ दिवसांच्या प्रवासानंतर हे गट मानसरोवरला पोहोचतील. यात्रेसाठी रवाना होण्यापूर्वी हे यात्रेकरू दिल्लीत वैद्यकीय तपासणीसाठी थांबतील. भगवान शंकराच्या दर्शनासाठी केली जाणारी ही यात्रा गंगटोक इथून सुरु होऊन नाथू ला मार्गे कैलास मानसरोवरला जाते.

May 22, 2025 1:21 PM

views 26

कैलास मानसरोवर यात्रेसाठी ७५० यात्रेकरुंची निवड

कैलास मानसरोवर यात्रेसाठी यंदा ७५० यात्रेकरुंची ऑनलाईन संगणकीय सोडतीद्वारे काल निवड करण्यात आली. पहिली तुकडी येत्या ३० जूनला रवाना होईल, २५ ऑगस्टपर्यंत प्रत्येकी ५० यात्रेकरुंच्या १५ तुकड्या ही यात्रा पूर्ण करतील. यापैकी पाच तुकड्या लिपुलेखमार्गे तर दहा तुकड्या नथुलामार्गे जातील.

April 22, 2025 1:31 PM

views 27

कैलास मानसरोवर यात्रा येत्या ३० जूनपासून पुन्हा सुरु

कोविडमुळे गेली ४ वर्षं स्थगित असलेली कैलास मानसरोवर यात्रा येत्या ३० जूनपासून पुन्हा सुरु होत आहे. यंदा यात्रेकरू उत्तराखंड मार्गाने  कैलास मानसरोवरसाठी रवाना होणार असून, उत्तराखंड सरकार आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या देखरेखीखाली यात्रा आयोजित केली जाईल. कुमाऊं मंडळ विकास निगम कडे यात्रेच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.   ही यात्रा यंदा दिल्लीपासून सुरू होईल आणि पिठोरागड जिल्ह्यातल्या  लिपुलेख खिंडीतून यात्रेकरू चीन मध्ये प्रवेश करतील. एकूण २५० यात्रेकरू २२ दिवसांच्या या खडतर प्रव...

January 28, 2025 2:51 PM

views 22

कैलास मानसरोवर यात्रा सुरू होणार, भारत-चीनमध्ये सहमती

कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करणे, भारत आणि चीन दरम्यान थेट विमान सेवा आणि परस्परांच्या देशातल्या नद्यांची माहिती एकमेकांना देण्याविषयी भारत आणि चीनमध्ये सहमती झाली आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यात काल झालेल्या चर्चेत यावर सहमती झाली. दोन्ही देशाचे राजनैतिक संबंध सुरू व्हायला यंदा ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्तानं दोन्ही देशातले संबंध आणखी दृढ करणे आणि सामान्य नागरिकांमध्ये जनजागृती करण्यावरही दोन्ही देशात सहमती झाली. व्यापार आणि अर्थव्यवस्थ...