August 5, 2025 5:11 PM

views 80

पर्यायी व्यवस्था पूर्ण होईपर्यंत, कबुतरांना नियंत्रित खाद्यपुरवठा सुरू ठेवावा – मुख्यमंत्री

कबूतरखाना अचानक बंद करणे योग्य नाही, त्यांच्यासाठी पर्यायी व्यवस्था पूर्ण होईपर्यंत मुंबई महापालिकेनं कबुतरांना नियंत्रित खाद्यपुरवठा सुरू ठेवावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मंत्रालयात घेतलेल्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. कबुतरांसाठी पर्यायी व्यवस्था होईपर्यंत त्यांची उपासमार होऊ नये याकडे लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. मुंबई महापालिकेला पक्षीगृह उभारण्याची सूचना त्यांनी यावेळी केली.

August 3, 2025 3:24 PM

views 49

कबुतरखाना हटवण्याविरोधात जैन समाजाची शांतीदूत यात्रा

मुंबईतले कबुतरखाने हटवण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर महापालिकेनं सुरु केलेल्या कारवाई विरोधात जैन समाजानं आज शांतीदूत यात्रा काढली. या कारवाईमुळे आपल्या धार्मिक भावना दुखावल्या जात असल्याचं जैन समाजानं म्हटलं आहे. तर बिल्डर लॉबीचा दबावामुळे कबुतरखाना हटवला जात असल्याचा दावाही अनेकांकडून केला जात आहे.   याआधी शुक्रवारी दादर इथल्या कबुतरखान्यावरच्या कारवाईलाही जैन समाजानं विरोध केला होता. त्यानंतर पालिकेनं काल ताडपत्री लावून कबुतरखाना बंद केला आणि कबुतरांना खायला घालण्यावर बंदी...