August 12, 2025 3:23 PM

views 100

वादग्रस्त न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरोधात महाभियोग चालवण्याचा प्रस्ताव मंजूर

वादग्रस्त न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांना पदावरुन हटवण्यासाठी महाभियोग चालवण्याचा प्रस्ताव आज लोकसभेत सादर झाला. सभापती ओम बिरला यांनी सांगितलं की, महाभियोग चालवण्याचे १४६ सदस्यांचे प्रस्ताव सभागृहाला मिळाले आहेत.   न्यायमूर्ती वर्मा यांच्यावरच्या आरोपांचं गंभीर स्वरुप लक्षात घेऊन त्या प्रकरणी चौकशीसाठी तीन सदस्यांच्या समितीची घोषणा सभापतींनी केली. त्यात सर्वोच्च न्यायलयाचे न्यायमूर्ती अरविंद कुमार, मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश महिंद्र मोहन श्रीवास्तव आणि ज्येष्ठ विधिज्ञ बी. व्ही. ...

August 7, 2025 1:15 PM

views 41

वादग्रस्त न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

वादग्रस्त न्यायमूर्ती  यशवंत वर्मा यांना पदावरुन हटवण्यासंदर्भात नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीच्या निर्णयाला आव्हान देणारी वर्मा यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. न्यायमूर्ती दीपांकर दत्त आणि न्यायमूर्ती ए. जी. मसीह यांनीसांगितलं की, वर्मा यांना, अंतर्गत समितीच्या चौकशी प्रक्रीयेत सहभागी झाल्यानंतर समितीच्या निर्णयाला आव्हान देता येणार नाही.   न्यायमूर्ती यशवंत वर्मा दिल्ली उच्च न्यायालयात असताना त्यांच्या घराच्या आवारात मोठ्या प्रमाणात रोकड आढळल्यामुळे वादग्रस्त ठरले आहेत.