July 26, 2025 8:43 PM
136
सरन्यायाधीशपदावरुन निवृत्त झाल्यावर कोणतंही शासकीय पद स्वीकारणार नाही-भूषण गवई
सरन्यायाधीशपदावरुन निवृत्त झाल्यावर आपण कायदेविषयक सल्ला- मार्गदर्शन आणि लवाद या पर्यायी तंटा निवारण व्यवस्थेसाठी काम करणार असून कोणतंही शासकीय पद स्वीकारणार नाही, असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी सांगितलं आहे. अमरावती जिल्हा आणि सत्र न्यायालयात टी. आर. गिल्डा स्मृती ई-लायब्ररी'चं उद्घाटन करताना आज ते बोलत होते. या ई वाचनालयामुळे वकीलांना कायदेशीर संदर्भ, निर्णय आणि लेख त्वरित उपलब्ध होतील. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती आलोक आराधे आणि इतर न्यायाधीश तसंच इतर मान्यवर...