December 15, 2025 7:22 PM

views 76

प्रधानमंत्री मोदी जॉर्डनची राजधानी अम्मान इथं पोहोचले

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज तीन देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात जॉर्डनची राजधानी अम्मान इथं पोहोचले. जॉर्डनचे प्रधानमंत्री जाफर हसन यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं. अम्मान इथल्या भारतीय समुदायानं केलेल्या स्वागताबद्दल प्रधानमंत्री मोदी यांनी समाजमाध्यमाद्वारे त्यांचे आभार मानले. जॉर्डनचे राजे अब्दुल्ला दुसरे इब्न अल हुसैन यांच्या निमंत्रणावरून ते जॉर्डनला भेट देत आहेत. यादरम्यान राजे अब्दुल्ला आणि प्रधानमंत्री जाफर हसन यांच्याशी प्रधानमंत्री मोदी सखोल द्विपक्षीय चर्चा करतील, तसंच जॉर...

February 13, 2025 1:37 PM

views 70

गाझा पट्टीतल्या आजारी बालकांना उपचारांसाठी जॉर्डनमध्ये प्रवेश

गाझा पट्टीच्या तटवर्ती भागातली आरोग्य सेवा पूर्णपणे कोलमडल्यामुळे तिथल्या २ हजार आजारी बालकांना वैद्यकीय उपचारांसाठी आपल्या देशात प्रवेश दिला जाईल, असं  जॉर्डनचे प्रधानमंत्री जाफर हसन यांनी म्हटलं आहे. जॉर्डनच्या सरकारी वृत्त संस्थेनं म्हटलं आहे की, पॅलेस्टिनींचं कोणत्याही प्रकारे पुनर्वसन अथवा विस्थापन होऊ नये, अशी जॉर्डन सरकारची स्पष्ट भूमिका असून, प्रधानमंत्री हसन यांनी त्याचं समर्थन केलं आहे. पॅलेस्टिनींच्या कोणत्याही समस्येवर तोडगा काढण्यासाठी जॉर्डन जबाबदार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

September 9, 2024 3:26 PM

views 68

जॉर्डन आणि गाझा सीमेवर झालेल्या गोळीबारात तीन इस्रायली नागरिकांचा मृत्यू

जॉर्डन आणि गाझा सीमेवर झालेल्या गोळीबारात तीन इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती इस्रायल संरक्षण दलानं दिली आहे. हल्लेखोर जॉर्डनचा रहिवासी असून सीमेवर ऍलनबी पूल ओलांडताना त्यानं एका ट्रकमधून येऊन गोळीबार केला. त्यानंतर संरक्षण दलाच्या जवानांच्या प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात हल्लेखोर मारला गेला. तो घेऊन आलेल्या ट्रकची तपासणी केल्याचं इस्रायल संरक्षण दलानं सांगितलं. या घटनेचा तपास करत असल्याचं जॉर्डन सरकारनं म्हटलं आहे. दरम्यान, या हल्ल्यानंतर सीमेवरला रस्ता दोन्ही बाजूंनी बंद करण्य...