February 22, 2025 12:48 PM

views 67

जपान हा परदेशी गुंतवणुकीचा पाचवा सर्वात मोठा स्रोत- पीयूष गोयल

जपान देश भारताच्या आर्थिक वाढीसाठी सहकार्य करणारा प्रमुख देश असून परदेशी गुंतवणुकीचा तो पाचवा सर्वात मोठा स्रोत आहे, असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं भारत-जपान अर्थव्यवस्था आणि गुंतवणूक मंचाला संबोधित करताना ते काल बोलत होते. २००० ते २०२४ दरम्यान जपानमधून सुमारे ४३ अब्ज डॉलर पेक्षा अधिक ‘थेट परकीय गुंतवणूक’ झाली असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं.   दोन्ही देशांमधली बंधुता, लोकशाही, संस्कृती आणि आर्थिक सहकार्यामध्ये असलेली जागतिक स्तरावरची धोर...

February 21, 2025 8:22 PM

views 87

जपान हा भारताच्या आर्थिक वाढीतला प्रमुख सहयोगी – मंत्री पीयूष गोयल

जपान हा भारताच्या आर्थिक वाढीतला प्रमुख सहयोगी असल्याचं प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज केलं. नवी दिल्ली इथे भारत-जपान अर्थव्यवस्था आणि गुंतवणूक मंचाला ते संबोधित करत होते. साल २००० ते २०२४ या काळात जपानमधून थेट परकीय गुंतवणूक ४३ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त झाली आहे. जपान हा भारताच्या परदेशी गुंतवणुकीचा पाचवा सर्वात मोठा स्रोत असल्याचंही गोयल यांनी यावेळी सांगितलं. सध्या १ हजार ४०० हून अधिक जपानी कंपन्या भारतात कार्यरत आहेत. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन, तसंच दिल्ली, अ...

January 2, 2025 8:32 PM

views 61

जपानमध्ये सायबर हल्ल्यामुळे अनेक वेबसाईटची सेवा खंडित

जपानमध्ये आज सकाळी सायबर हल्ल्यामुळे अनेक वेबसाईटची सेवा खंडित झाली. वेबसाईटच्या प्रणालीमध्ये बिघाड झाल्यामुळे सेवा खंडित झाल्याची माहिती एनटीटी डोकोमो या जपानच्या सर्वात मोठ्या मोबाईल कंपनीनं दिली. जपानमध्ये अलीकडेच झालेल्या अशा प्रकारच्या सायबर हल्ल्यामुळे राष्ट्रीय बँका आणि विमानतळ ऑपरेटरसह, अनेक कंपन्यांची यंत्रणा कोलमडली होती. 

November 19, 2024 9:46 AM

views 49

आशियाई हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय महिला संघाचा उपांत्य सामना आज जपानबरोबर

बिहारमधील राजगीर इथं सुरु असलेल्या आशियाई महिला हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत साखळीतील अखेरच्या सामन्यात भारतीय संघानं जपानवर ३-० अशी मात केली. या स्पर्धेतील उपांत्य फारीचा सामना आज याच जपान संघाबरोबर खेळला जाणार आहे. दिपिकानं या स्पर्धेत सर्वाधिक गोल केले असून कालच्या सामन्यातही तीनं २ गोल नोंदवले तर उपकर्णधार नवनीत कौरने ३७ व्या मिनिटाला गोल केला. अनेक खेळांमध्ये पाच विजयांसह, भारतीय संघ सर्वाधिक १५ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे, तो ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या चीनपेक्षा १२ गुणांसह पुढे आहे.

November 11, 2024 8:38 PM

views 43

जपानमध्ये लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीचे नेते शिगेरू इशिबा यांची प्रधानमंत्रीपदी पुन्हा निवड

जपानमध्ये लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीचे नेते शिगेरू इशिबा यांची आज जपानच्या प्रधानमंत्रीपदी पुन्हा निवड झाली आहे. प्रधानमंत्र्यांच्या निवडीसाठी जपानच्या संसदेनं विशेष अधिवेशन बोलावलं होतं.    गेल्या महिन्यात झालेल्या निवडणुकीत मिळालेलं बहुमत गमावल्यानंतर लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी आणि कोमेटो या सत्ताधारी युतीचे इशिबा आणि कॉन्स्टिट्यूशनल डेमोक्रॅटिक पार्टीचे नेते योशिहिको नोडा यांच्यात आज फेरमतदान झालं. यामध्ये इशिबा यांना दोन्ही सभागृहांमध्ये सर्वाधिक २२१ मते मिळाली.    

October 24, 2024 2:34 PM

views 68

भारतात शिक्षणासाठी जास्त खर्च, युनेस्कोच्या पाहणीचा निष्कर्ष

चीन किंवा जपानपेक्षा भारतात शिक्षणासाठी जास्त खर्च करण्यात येतो असं युनेस्कोच्या पाहणीत आढळलं आहे. भारतात शिक्षणावरचा खासगी आणि सरकारी खर्च आशियातल्या इतर देशांपेक्षा जास्त असल्याचं युनेस्कोच्या अहवालात म्हटलं आहे. २०१५ ते २०२४ या काळात शिक्षणाला प्रोत्साहन देण्याकरता स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या ४ पूर्णांक १ दशांश टक्के ते ४ पूर्णांक ६ दशांश टक्के खर्च भारतात करण्यात आला. आंतरराष्ट्रीय स्तरावर संयुक्त राष्ट्रांनी २०३० पर्यंतच्या कालावधीसाठी निश्चित केलेल्या उद्दिष्टांमधे म्हटलंय की राष्ट्राच्य...

October 20, 2024 1:44 PM

views 63

हॉकी : जोहोर सुलतान विश्वकरंडक स्पर्धेत भारताचा जपानवर ४-२ असा विजय

हॉकीमध्ये भारताच्या कनिष्ठ पुरुष संघानं जोहोर सुलतान २०२४ विश्वकरंडक स्पर्धेत जपानच्या संघाचा ४-२ असा पराभव केला. मलेशियातील तमन दाया हॉकी मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. आमीर अली, गुरज्योतसिंग, आनंद सौरभ कुशवाहा आणि अंकित पाल यांनी भारतासाठी गोल केले. हॉकीपटू पी. आर. श्रीजेश या संघाचा प्रशिक्षक आहे. भारतीय संघाचा सामना आज दुपारी ब्रिटनच्या संघाशी होत आहे.

October 19, 2024 2:11 PM

views 87

सुल्तान जोहोर चषक स्पर्धेत भारतीय ज्युनिअर पुरुष हॉकी संघाचा पहिला सामना आज जपानशी होणार

मलेशिया इथं होणाऱ्या सुल्तान जोहोर चषक स्पर्धेत भारतीय ज्युनिअर पुरुष हॉकी संघाचा पहिला सामना आज जपानशी होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी १ वाजून ३५ मिनिटांपासून हा सामना सुरू होत आहे. भारताची लढत २० ऑक्टोबरला ग्रेट ब्रिटनशी, २२ ऑक्टोबरला मलेशियाशी आणि २३ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. सांघिक लढतींतील भारताचा अखेरचा सामना २५ ऑक्टोबरला न्यूझिलंडविरुद्ध होणार आहे.  

October 9, 2024 1:41 PM

views 62

आशियाई टेबल टेनिस विजेतेपद स्पर्धेच्या महिला सांघिक प्रकारात आज भारताचा सामना जपानबरोबर होणार

आशियाई टेबल टेनिस विजेतेपद स्पर्धेच्या महिला सांघिक प्रकारात आज भारताचा सामना जपानबरोबर होणार आहे. कझाकस्तानात सुरु असलेल्या या स्पर्धेत भारतीय संघाने काल उपान्त्यपूर्व फेरीत दक्षिण कोरियाचा ३विरुद्ध २ अशा गुणफरकाने पराभव केला. पुरुष गटाच्या उपान्त्यपूर्व फेरीत आज भारताची लढत कझाकस्तानशी होईल.

September 24, 2024 1:08 PM

views 59

जपानला ५.९ रिक्टर क्षमतेच्या भूकंपाचा धक्का

जपानला आज सकाळी सव्वा आठ वाजता ५ पूर्णांक ९ रिक्टर क्षमतेच्या भूकंपाचा धक्का बसला त्यानंतर टोकियोच्या दक्षिणेकडच्या बेटांवर ५० सेंटीमीटर ऊंचीच्या त्सुनामीच्या लाटा आदळल्या.या भूकंपाचा केंद्रबिंदू पॅसिफिक महासागरात सुमारे १० किलोमीटर अंतरावर असलेल्या इझू बेट साखळीतल्या तोरिशिमाजवळ होता. भूकंपाच्या केंद्रापासून अंदाजे १८० किलोमीटर अंतरावर असलेल्या हाचिजो बेटावर ५० सेंटीमीटर आणि मियाके बेटावर१० सेंटीमीटर त्सुनामी लाटांची नोंद झाली.