September 7, 2025 3:54 PM

views 88

राज्यात ठिकठिकाणी भक्तीभावानं गणरायाला निरोप

राज्यात इतरत्रही भक्तीभावानं गणरायाला निरोप दिला गेला. ठिकठिकाणी ढोल-ताशांच्या गजरात, टाळ-मृदंगांच्या तालावर गणरायाला निरोप देण्यासाठी निघालेल्या भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत असल्याचं चित्र दिसत होतं. पुण्यात मानाच्या पाचही गणपतींचं विसर्जन झालं, मात्र काही ठिकाणी आज दुपारपर्यंत विसर्जन मिरवणुका सुरु होत्या. जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यातही ढोल तश्याच्या गजरात लाडक्या गणरायाला निरोप दिला गेला. अमळनेर इथं आज पहाटे ५ वाजेपर्यंत, तर शहरात रात्री १ वाजेपर्यंत मुख्य मिरवणूका सुरू होत्या. या मिरवणूक प...

June 12, 2025 3:08 PM

views 89

जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह तुफान पाऊस

जळगाव शहरासह जिल्ह्यात काल रात्री  प्रचंड वादळी वाऱ्यांसह तुफान पावसाने हजेरी लावली. या पावसाचा जोर इतका प्रचंड होता,की रस्त्यावर ये जा करणाऱ्या वाहनांसह नागरिकांना चालणे देखील अवघड झालं होतं असं आमच्या वार्ताहराने कळवलं आहे.    परिसरात वीज पुरवठा खंडित झाला होता. सर्व नागरिकांनी सावधगिरी बाळगावी आणि भर पावसात घराबाहेर न पडता सुरक्षित ठिकाणी थांबावं तसेच आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन हेल्पलाइन क्रमांक 1077 वर त्वरित संपर्क साधावा असं आवाहन जिल्हा प्रशासनानं  केलं आहे.

April 23, 2025 6:31 PM

views 72

जळगाव जिल्ह्यात १७ लाख ८२ हजार २०० रुपये किंमतीचे बनावट एचटीबीटी कापूस बियाणं जप्त

जळगाव जिल्ह्यात कृषी विभागाच्या जिल्हा भरारी पथकानं केलेल्या कारवाईत चोपडा तालुक्यातल्या चुंचाळे इथून १७ लाख ८२ हजार २०० रुपये किंमतीचे बनावट एचटीबीटी कापूस बियाणं जप्त केलं. या प्रकरणी नितीन नंदलाल चौधरी या संशयित आरोपीविरोधात बियाणांशी संबंधित विविध नियम आणि कायदे, महाराष्ट्र कापूस बियाणं अधिनियम आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.   यासंदर्भात मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अक्कुलखेडा रस्त्यावर एका पत्र्याच्या शेडवर टाकलेल्या छाप्यात कापसाच्या प्रतिबंधित बायाणा...

March 24, 2025 6:52 PM

views 77

जळगावात सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३००व्या जयंती वर्षानिमित्त जळगाव इथं आज विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रसंगी अहिल्यादेवींच्या जीवनचरित्रावर आधारित नाट्य, संगीत,  तसंच दृक-श्राव्य कार्यक्रम सादर करण्यात आले. तृतीय जन्मशताब्दी दिनानिमित्त अहिल्यादेवींना वंदन करणाऱ्या तसंच त्यांच्या कर्तृत्वाचं गुणगान करणाऱ्या शाहिरी पोवाड्यांचंही  यावेळी सादरीकरण झालं. 

February 16, 2025 3:28 PM

views 63

जळगावात ‘मेरा युवा भारत’ उपक्रमाचं आयोजन

केंद्र सरकारच्या नेहरू युवा केंद्राचा ‘मेरा युवा भारत’ उपक्रम १३ ते १७ फेब्रुवारी दरम्यान जळगाव इथं सुरू आहे. या उपक्रमाअंतर्गत आंतरजिल्हा युवा आदानप्रदान कार्यक्रमात मुंबईतल्या २७ युवक युवतींचा समावेश आहे. राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी या युवकांशी संवाद साधत जळगावच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि कृषि परंपरेची माहिती दिली. 

January 23, 2025 2:31 PM

views 66

जळगाव रेल्वे अपघातात १३ प्रवाशांचा मृत्यु

  महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात परधाडे स्थानकाजवळ काल संध्याकाळी झालेल्या रेल्वे अपघातात मृतांची संख्या १३ झाली आहे. त्यातल्या १० जणांची ओळख पटली असून त्यात एक लहान मूल आणि तीन महिलांचा समावेश आहे. शेजारच्या डब्यात आग लागल्याची अफवा पसरल्यामुळं अपघातग्रस्त डब्यातल्या अनेकांनी गाडीतून बाहेर उड्या मारल्या आणि ते भरधाव वेगाने येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसखाली सापडले असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज वार्ताहरांना सांगितलं.   आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरिश महाजन,आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाट...

October 24, 2024 3:37 PM

views 49

जळगाव जिल्ह्यात पोलिसांच्या कारवाईत दीड कोटी ४५ लाख रोकड जप्त

जळगाव जिल्ह्यातल्या कसोदा गावाजवळ पोलिसांनी काल रात्री दीड कोटी ४५ लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस काल रात्री एरंडोल विधानसभा परिसरात गस्त घालत होते.  त्यावेळी एका कारची तपासणी केली असता त्यात हे पैसे आढळून आले. ही रक्कम कोणाची आहे याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान अंमळनेर तालुक्यात एका कारमधून १६ लाख ३८ हजार रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे.

August 25, 2024 3:24 PM

views 55

देशाला जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था करण्याच्या वाटचालीत महिलांचा मोठा वाटा – प्रधानमंत्री

देशाला जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था करण्याच्या वाटचालीत महिलांचा मोठा वाटा असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. जळगाव मध्ये आज झालेल्या लखपती दिदी संमेलनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज देशभरातल्या ११ लाख नव्या लखपती दीदींना, प्रतिकात्मक स्वरुपात प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव केला गेला, त्यावेळी ते बोलत होते. गेल्या दहा वर्षांत १ कोटी लखपती दीदी झाल्या आहेत, तर गेल्या दोन महिन्यात त्यात आणखी ११ लाख लखपती दीदींची भर पडल्याची माहिती प्रधानमंत्र्यांनी यावेळी दिल...

August 25, 2024 10:40 AM

views 83

नेपाळ बस दुर्घटनेतल्या २५ जणांचे मृतदेह जळगावात दाखल

नेपाळ इथल्या बस दुर्घटनेतल्या २५ जणांचे मृतदेह काल जळगावच्या विमानतळावर वायुदलाच्या विशेष विमानानं आणण्यात आले. त्यानंतर संपूर्ण शासकीय प्रक्रियेच्या पूर्ततेनंतर ते नातेवाईकांना सुपूर्द करण्यात आले. केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांसह अन्य लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.

June 27, 2024 9:17 AM

views 74

जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा बसस्थानकाला सुंदर बसस्थानक अभियानाचा पुरस्कार जाहीर

राज्य परिवहन महामंडळाच्या हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानात अ वर्गामध्ये जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा बसस्थानकानं प्रथम क्रमांक मिळवला आहे.   चोपडा आगाराचे व्यवस्थापक महेंद्र पाटील याबाबत प्रतिक्रिया देताना म्हणाले, या अभियानाअंतर्गत 'ब' वर्गामध्ये भंडारा जिल्ह्यातल्या साकोली बसस्थानकाला तर 'क' वर्गामध्ये सातारा जिल्ह्यातल्या मेढा बसस्थानकाला प्रथम क्रमांक मिळाला आहे. लोकसहभागातून बसस्थानकाचा विकास या संकल्पनेवर राज्यात हे अभियान राबवण्यात आलं.