June 13, 2025 10:15 AM

views 51

आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेत भारतीय नेमबाज सिफ्ट कौर समराने पटकावलं कास्य पदक

जर्मनीतील म्युनिक इथं झालेल्या आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेत भारतीय नेमबाज सिफ्ट कौर समराने काल महिलांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन स्पर्धेत कास्य पदक पटकावलं. 23 वर्षीय सिफ्टने अंतिम फेरीत 453 पुर्णांक 1 गुण मिळवत तिसरे स्थान पटकावलं.  

April 9, 2025 1:35 PM

views 56

आयएसएसएफ विश्वकरंडक स्पर्धेत विजयवीर सिधू तसेच सुरूची सिंगनं पटकावलं सुवर्णपदक

अर्जेंटिनामध्ये सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वकरंडक स्पर्धेत, काल विजयवीर सिधू याने पुरूषांच्या २५ मीटर रॅपिड फायर पिस्तुल प्रकारात भारताला पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं. तर महिला श्रेणीत सुरूची सिंगनं १० मीटर एअर रायफल प्रकारात वैयक्तिक सुवर्णपदक पटकावलं.    

April 7, 2025 1:49 PM

views 50

ISSF World Cup : १० मीटर एयर रायफलमध्ये भारताला सुवर्णपदक

विश्वविजेता रुद्रांक्ष पाटील यानं ब्युनोस आयर्स इथं सुरू असलेल्या आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत १० मीटर एअर रायफलमध्ये पुरुषांच्या गटात सुवर्ण पदक पटकावलं. भारताचं या स्पर्धेतील हे दुसरं सुवर्ण पदक असून या स्पर्धेत भारताच्या खात्यात आतापर्यंत ४ पदकं जमा झाली आहेत. महाराष्ट्राच्या रुद्रांशने अंतिम फेरीत २५२ पूर्णांक ९ गुणांचा वेध घेतला. विश्वचषक स्पर्धेतील हे त्यांचे दुसरे वैयक्तिक सुवर्णपदक आहे.

April 5, 2025 2:26 PM

views 54

आय एस एस एफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत ५० मिटर रायफल स्पर्धेच्या महिला गटात भारताच्या सिफ्ट कौर साम्रा ने पटकावलं सुवर्णपदक

अर्जेंटिना इथं सुरु असलेल्या आय एस एस एफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत ५० मिटर रायफल स्पर्धेच्या महिला गटात काल भारताच्या सिफ्ट कौर साम्रा ने सुवर्णपदक पटकावलं तर पुरुष गटात आशियाई स्पर्धा विजेत्या चैन सिंग ने कांस्य पदक पटकावून भारताचं खात उघडलं आहे. भारताचा ऐश्वर्य प्रताप सिंग चौथ्या क्रमांकावर फेकला गेला आहे.