October 6, 2025 1:00 PM

views 74

इस्रायलनं गाझावर केलेल्या हल्ल्यात ६५ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू

इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात गेल्या चोवीस तासात ६५ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर १५३ जण जखमी झाले आहेत. इस्रायली हल्ल्यात आतापर्यंत  ६७ हजार १३९ जणांचा मृत्यू झाला असून १ लाख ७० हजार जण जखमी झाल्याचं गाझाच्या आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. संघर्ष सुरू झाल्यापासून उपासमारीने ४६० जणांनी प्राण गमावल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. गाझापट्टीतील संघर्ष थांबवण्याबाबत चर्चा सुरू असतानाही गेल्या ४८ तासात इस्रायलने १३० हून अधिक  हवाई हल्ले केल्याचं वृत्त आहे.

February 9, 2025 8:01 PM

views 60

युध्दविरामासाठी गाझाच्या मुख्य भागातून इस्त्रायली फोजांची माघार सुरु

हमास आणि इस्रायलमधल्या युध्दविरामाचा भाग म्हणून गाझाच्या  मुख्य भागातून इस्त्रायली फौजेच्या तुकड्या आजपासून परतायला लागल्या आहेत. इस्रायली अधिकाऱ्यांनी ही माहिती देताना या युध्दविरामाच्या करारानुसार आपण पावलं उचलत असलो तरी या कराराची पुढची वाटचाल ही दोन्ही बाजूंवर अवलंबून  असल्याचं नमूद केलं. युद्धविरामाचा भाग म्हणून पॅलेस्टिनी नागरिकांना नेतझरिम हद्द ओलांडून उत्तरेकडच्या भागात जाण्याची परवानगी इस्रायलने दिली आहे. गेले पंधरा महिने सुरु असलेल्या या संघर्षाला विराम  मिळाल्याच्या भावनेने अनेक पॅलेस...

October 20, 2024 8:36 PM

views 60

इस्रायलनं गाझाच्या बेत लाहिया परिसरात केलेल्या हल्ल्यात ८७ जणांचा मृत्यू

इस्रायलनं गाझाच्या उत्तर भागातल्या बेत लाहिया परिसरात केलेल्या हल्ल्यात ८७ जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. ढिगाऱ्याखाली आणखी काही जण गाडले गेल्याची भीती व्यक्त होत आहे. मदत आणि बचावकार्य सुरू असल्याची माहिती गाझा सरकारच्या माध्यम कार्यालयानं दिली आहे. इस्राईल लष्करानं गाझाच्या उत्तर भागात सुरू केलेल्या मोहिमेमुळे या परिसरात अन्न, पाणी आणि वैद्यकीय सेवांसारख्या अनेक सुविधा खंडित आहेत. इस्राईलच्या सुरक्षा दलांनी मात्र हमासच्या आरोपांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत संख्या वाढवून सांगितली जात असल्याच...

October 18, 2024 2:54 PM

views 83

हमासचा प्रमुख याह्या सिनवार इस्राईलने गाझा पट्टीत केलेल्या हल्ल्यात ठार

इस्राईलने गाझा पट्टीत केलेल्या हल्ल्यात हमासचा प्रमुख याह्या सिनवार मारला गेला. सिनवार ज्या इमारतीमध्ये लपला होता, त्यावर इस्राईलनं बॉम्ब हल्ला केला.मात्र, हमासनं सिनवारच्या मृत्यूला अद्याप दुजोरा दिलेला नाही. सिनवर हा हमासच्या राजनैतिक विभागाचा प्रमुख होता. तसंच तो इस्माइल हानिए याचा उत्तराधिकारी होता. गेल्या वर्षी ७ ऑक्टोबरला इस्राईलवर झालेल्या हल्ल्याचा सिनवार हा प्रमुख सूत्रधार होता. दरम्यान, अजून हे युद्ध संपलेलं नाही, असं इस्राईलचे प्रधानमंत्री बेन्यामिन नेतान्याहू यांनी सांगितलं. काही आठव...

August 22, 2024 12:51 PM

views 62

गाझा पट्टीतून सैन्य माघारी घेणार असल्याचं वृत्त इस्रायलने फेटाळलं

हमास संघटनेसोबतच्या संभाव्य युद्धविरामाच्या पार्श्वभूमीवर इस्रायल गाझा पट्टीतून सैन्य माघारी घेणार असल्याचं वृत्त इस्रायलच्या प्रधानमंत्री कार्यालयानं फेटाळलं आहे. इस्रायल फिलाडेल्फी कॉरिडोरमधून लष्कर माघारी घेण्यासाठी बेंजामीन नेत्यान्याहू तयार असल्याचं वक्तव्य अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी सोमवारी केलं होतं. त्यानंतर नेत्यान्याहू यांच्या कार्यालयानं हे स्पष्टीकरण दिलं आहे.

August 16, 2024 8:04 PM

views 70

इस्राएलचे प्रधानमंत्री बेंजामीन नेतन्याहू यांचा प्रधानमंत्री मोदी यांच्याशी संवाद

इस्राएलचे प्रधानमंत्री बेंजामीन नेतन्याहू यांनी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधला आणि पश्चिम आशियातल्या सद्य स्थितीबाबत चर्चा केली. सध्याचा तणाव कमी करणं गरजेचं आहे, असं मोदी यांनी यावेळी सांगितलं. सर्व बंदीवानांची तात्काळ सुटका करण्याचं आवाहन त्यांनी केलं. संवाद आणि राजनितीक मार्गानं संघर्षावर लवकर आणि शांततापूर्व तोडगा काढण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.    भारत-इस्राएल धोरणात्मक भागिदारी अधिक मजबूत करण्यासाठी तसंच उभयपक्षी सहकार्याच्या विविध बाजूंवर दोन्ही ने...

August 10, 2024 8:25 PM

views 61

इस्रायलने गाझापट्टीवर केलेल्या हवाई हल्ल्यात ९३ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू

इस्रायलने गाझापट्टीवर केलेल्या हवाई हल्ल्यात ९३ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला. हल्ला झालेला भाग गाझाच्या पूर्वेला आहे. या भागात विस्थापितांनी आश्रय घेतला असून पहाटेच्या प्रार्थनेच्या वेळी हा हल्ला झाल्याची माहिती गाझाच्या स्थानिक सुरक्षा संस्थेनं दिली आहे. हमासच्या दहशतवाद्यांना ठार करण्यासाठी हा हल्ला केल्याची माहिती इस्रायलच्या संरक्षण दलानं दिली आहे.

July 10, 2024 1:09 PM

views 63

इस्रायलने गाझापट्टीतल्या शाळेवर केलेल्या हल्ल्यात २५ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू

इस्रायलने गाझापट्टीतल्या एका शाळेवर काल केलेल्या हल्ल्यात २५ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला. या इमारतीत हजारो स्थलांतरितांनी आश्रय घेतला होता, असं हमासच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितलं.    या हल्ल्यात किती नागरिकांचा मृत्यू झाला याची माहिती घेत आहोत, असं इस्रायलच्या लष्कराने म्हटलं आहे. हा हवाई हल्ला हमास बंडखोरांसाठी करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला.