February 17, 2025 8:33 PM

views 53

इस्रायली लष्कराच्या हल्ल्यात हमासच्या मोहिम विभागाचा प्रमुख मोहम्मद शाहीन ठार

इस्रायलच्या लष्करानं आज दक्षिण लेबनॉनमध्ये केलेल्या ड्रोन हल्ल्यात हमासचा लष्कराच्या मोहिम विभागाचा प्रमुख मोहम्मद शाहीन ठार झाल्याचा दावा केला आहे. शाहीनने लेबनॉनच्या हद्दीतून दहशतवादी हल्ल्यांची योजना आखल्याचा आरोप इस्रायलनं केला आहे. 

December 23, 2024 10:01 AM

views 38

इस्त्रायलनं गाझापट्टीत केलेल्या हल्ल्यात ३२ नागरिक ठार, ५४ जखमी

इस्त्रायलनं गेल्या 24 तासांत गाझापट्टीत केलेल्या हल्ल्यात किमान 32 पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले आणि 54 जण जखमी झाले आहेत, अशी माहिती गाझाच्या आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. दोहा इथं आंतरराष्ट्रीय स्तरावर इस्रायल आणि हमास यांच्यादरम्यान शस्त्रसंधीसाठी प्रयत्न होत आहेत. कतार, इजिप्त आणि अमेरिकेच्या मध्यस्थीनं दोन्ही देशांमध्ये अप्रत्यक्ष चर्चा गेल्या आठवड्यात दोहा इथं झाली. गेल्या वर्षी 7 ऑक्टोबरपासून गाझा युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत मृतांची संख्या 45 हजारच्या पुढे गेली आहे, अशी माहिती गाझामधील ह...