May 17, 2025 1:21 PM

views 76

आयएसआय दहशतवादी संघटनेतल्या स्लीपर मॉड्यूल च्या 2 सदस्यांना अटक

एनआयए, अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेनं आयएसआय या बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटनेच्या स्लीपर मॉड्यूल च्या दोन सदस्यांना अटक केली आहे. २०२३ साली  महाराष्ट्रात पुणे इथं  आयईडी ही स्फोटकं बनवणं आणि त्याची चाचणी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.  एनआयए नं त्यांना  मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली असून, ते इंडोनेशियाच्या जकार्ता इथून परतले होते.    हे दोन्ही आरोपी गेली दोन वर्ष फरार होते आणि एनआयएच्या मुंबईतल्या विशेष न्यायालयानं त्यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंटही जारी केलं होतं. दोन्...

July 6, 2024 10:19 AM

views 38

स्टेनलेस स्टील आणि ॲल्युमिनियमच्या भांड्यांसाठी ISI मार्क अनिवार्य

स्वयंपाकघराची सुरक्षितता, गुणवत्ता आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी केंद्र सरकारनं स्टेनलेस स्टील आणि ॲल्युमिनियमच्या भांड्यांसाठी भारतीय मानक संघटना BIS चं पालन करणं अनिवार्य केलं आहे. उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग DPIIT ने जारी केलेल्या आदेशानुसार, अशा भांड्यांसाठी ISI मार्क अनिवार्य आहे.   या आदेशाचं पालन न केल्यास शिक्षा होऊ शकते, असं ग्राहक व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. BIS ने स्वयंपाकघरातील अत्यावश्यक वस्तूंचा समावेश करणारी मानकांची श्रेणी नुकतीच तयार केली आहे.