August 12, 2025 3:37 PM

views 42

मुंबईत १८व्या खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडचं आयोजन

१८व्या खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडचं औपचारिक उद्घाटन आज मुंबईत होणार आहे. केंद्रसरकारचे  मुख्य वैज्ञानिक सल्लागार प्राध्यापक अजय कुमार सूद, अणुविज्ञान विभागाचे सचिव डॉ. अजय कुमार मोहंती आणि आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघटनेचे माजी उपाध्यक्ष प्राध्यापक अजय केंभावी यांच्यासह इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.   या स्पर्धेत  ६४ देशांमधून एकंदर २८८ विद्यार्थी  सहभागी होणार असल्याची माहिती स्पर्धेची आयोजक संस्था असलेल्या होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राचे संचालक प्र...

August 11, 2025 7:11 PM

views 30

१८वी खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकशास्त्र ऑलिम्पियाड आजपासून मुंबईत सुरू

१८वी खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकशास्त्र ऑलिम्पियाड आजपासून मुंबईत सुरू झालं. या स्पर्धेचं आत्तापर्यंतचं हे सगळ्यात भव्य स्वरूप असून ६४ देशांमधून एकंदर २८८ विद्यार्थी यात सहभागी झाले आहेत, अशी माहिती होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राचे संचालक प्राध्यापक अर्णब भट्टाचार्य यांनी दिली.   १० दिवस चालणाऱ्या या स्पर्धेचा मुख्य उद्देश खगोलशास्त्रात गती असणाऱ्या जगभरातल्या विद्यार्थ्यांना एकत्र आणणं, त्यांच्यात संवाद घडवून आणणं हा आहे, असं आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकशास्त्र ऑलिम्पियाडचे अध्यक्ष प...