August 13, 2026 8:09 PM

views 7

अयोध्येतील श्री रामजन्म तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या सीईओ पदासाठी १८ उमेदवारांच्या मुलाखती पूर्ण

अयोध्येतल्या ‘श्री रामजन्म तीर्थक्षेत्र ट्रस्ट’ च्या पहिल्या पूर्णवेळ मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या नियुक्तीसाठी नेमलेल्या निवड समितीने अंतिम यादीतल्या १८ उमेदवारांच्या मुलाखतींची प्रक्रिया पूर्ण केली असून, आता या पदासाठी काही नावांची शिफारस केली जाईल अशी माहिती संबंधित सूत्रांनी दिली.   या पदासाठी ५ हजार २०० उमेदवारांनी अर्ज केला होता. यामध्ये निवृत्त लष्करी अधिकारी, माजी प्रशासकीय अधिकारी, तसंच मंदिर प्रशासन, सुरक्षा आणि व्यवस्थापनाचा अनुभव असलेल्या व्यक्तींचा समावेश होता.