March 8, 2025 3:27 PM

views 62

२१ महिला पोलीस अंमलदारांना धुळ्यात कॉप ऑफ द मंथ पुरस्कार

जागतिक महिला दिन राज्यात उत्साहात साजरा होत आहे. यानिमित्त धुळे जिल्ह्यात उत्कृष्ट काम करणार्‍या २१ महिला पोलीस अंमलदारांना कॉप ऑफ द मंथ पुरस्कारानं गौरवण्यात आलं. परभणी जिल्ह्यात दैठणा इथल्या  जिल्हा परिषद केंद्रीय कन्या प्रशालेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. तर गोंदियात सायकल संडे ग्रुपच्या महिलांनी शहरात सायकल रॅली काढली. या सायकल रॅलीत गृह पोलीस अधीक्षक आणि उप विभागीय महिला पोलीस अधिकारी तसंच तरुणींनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली. अकोला शहरात वॉकेथॉनद्वारे महिला सक्षमीकरणा...

March 8, 2025 1:54 PM

views 49

जगभरासह देशात आज महिला दिन साजरा

जागतिक महिला दिन आज सर्वत्र साजरा केला जात आहे. सर्व महिला आणि मुलींसाठी अधिकार, समान हक्क आणि सबलीकरण ही यंदाच्या महिला दिनाची संकल्पना आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. हा दिवस महिलांचं योगदान आणि कर्तबगारीचा गौरव करण्याचा असून महिलांच्या विकासाच्या प्रवासात सर्व देशवासीयांनी त्यांना साथ द्यावी, असं आवाहन राष्ट्रपतींनी केलं आहे.    विकसित भारतासाठी महिलांच्या नेतृत्वाखालील विकास महत्वपूर्ण अस...

March 7, 2025 8:01 PM

views 59

आकाशवाणीचा वृत्तविभाग उद्याचा महिला दिन अनोख्या रीतीनं साजरा करणार

आकाशवाणीचा वृत्तविभाग उद्याचा जागतिक महिला दिन अनोख्या रीतीनं साजरा करणार आहे. आज मध्यरात्रीपासून पुढचे २४ तास प्रसारित होणारी सर्व हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र महिला वृत्तनिवेदकच सादर करणार  आहेत. वृत्त विभागाचा उद्या दिवसभराचा कारभारही महिला कर्मचारी वर्गच  सांभाळणार असून महिला दिनानिमित्त उद्या रात्री एका विशेष चर्चासत्राचं  प्रसारण केलं जाणार आहे.

March 6, 2025 1:19 PM

views 58

‘नारी शक्ती सह विकसित भारत’ या संकल्पनेवर आधारित यंदाचा महिला दिन

'नारी शक्ती सह विकसित भारत' या संकल्पनेवर आधारित यंदाचा महिला दिन साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी आज केली. या निमित्ताने नवी दिल्ली इथं विज्ञान भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत एका परिसंवादाचं आयोजनही करण्यात आल्याचं त्यांनी व्हिडीओ संदेशात म्हटलं आहे. महिलांनी आर्थिक, सामाजिक, राजकीय, राष्ट्रीय तसंच वांशिक, भाषिक आणि सांस्कृतिक सीमा ओलांडून दाखवलेल्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी यंदा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं ...

February 28, 2025 7:41 PM

views 51

आंतरराष्ट्रीय महिला दिन : महिला पर्यटकांना MTDCच्या पर्यटक निवासांमध्ये सवलत

MTDC अर्थात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त  राज्यातल्या महिला पर्यटकांना येत्या १ ते ८ मार्च या कालावधीत एमटीडीसीच्या पर्यटक निवासांमध्ये ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. एमटीडीसीच्या www.mtdc.co या संकेतस्थळावर ऑनलाइन बुकिंग करून या विशेष योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन पर्यटन विभागातर्फे करण्यात आले आहे.