November 24, 2025 7:04 PM

views 79

माहे युद्धनौका मुंबईत नौदलाच्या ताफ्यात दाखल

माहे ही युद्धनौका आज मुंबई इथं नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. माहे श्रेणीतली ही पहिली पाणबुडीविरोधी उथळ पाण्यातली युद्धनौका कोचीच्या जहाजबांधणी गोदीत तयार झाली असून यात ८० टक्क्यापेक्षा जास्त सामग्री स्वदेशी बनावटीची आहे. मलबार किनारपट्टीवरच्या माहे या ऐतिहासिक गावावरून हिचं नाव ठेवण्यात आलं आहे. या युद्धनौकेचं प्रतीक असलेली उरुमी ही तलवार, कलरीपयट्टू या युद्धकलेचा महत्त्वाचा भाग आहे.युद्धनौकेच्या दाखल झाल्यानिमित्त आयोजित सोहळ्यात व्हाईस ऍडमिरल कृष्णा स्वामिनाथन, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी...

November 24, 2025 11:47 AM

views 63

‘माहे’ युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात दाखल

मुंबई इथं माहे ही युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. माहे श्रेणीतली ही पहिली पाणबुडीविरोधी उथळ पाण्यातली युद्धनौका कोचीच्या जहाजबांधणी गोदीत तयार झाली असून यात ८० टक्क्यापेक्षा जास्त सामग्री स्वदेशी बनावटीची आहे. मलबार किनारपट्टीवरच्या माहे या ऐतिहासिक गावावरून हिचं नाव ठेवण्यात आलं आहे. या युद्धनौकेचं प्रतीक असलेली उरुमी ही तलवार, कलरिपयट्टू या युद्धकलेचा महत्त्वाचा भाग आहे.

November 24, 2025 11:43 AM

views 45

माहे युद्धनौका आज मुंबईत नौदलाच्या ताफ्यात दाखल होणार

स्वदेशी बनावटीची माहे श्रेणीतील पाणबुडीविरोधी उथळ पाण्यातील युद्धनौका भारतीय नौदलात आज दाखल होणार आहे. मुंबईत होणाऱ्या या समारंभाच्या अध्यक्षपदी लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी असतील. संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, माहे युद्धनौकेमुळे उथळ पाण्यातील स्वदेशी लढाऊ युद्धनौकेची नवी पिढी नौदलात दाखल होत आहे. माहेच्या निर्मितीत 80 टक्के स्वदेशी सामग्री आहे. भारताच्या सागरी सीमांच्या रक्षणासाठी समर्पित ही युद्धनौका पश्चिम किनाऱ्यावर तैनात असेल. मलबार किनारपट्टीवरच्या माहे या ऐतिहासिक गावावरू...