September 12, 2024 10:22 AM

views 36

नागालँडच्या तीन जिल्ह्यांमध्ये अंतर्गत निवास परवाना लागू करायला राज्य सरकारची मंजुरी

नागालँडमध्ये तीन जिल्ह्यांमध्ये अंतर्गत निवास परवाना म्हणजे आयएलपी लागू करायला राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे. चुमोकेडिमा, निउलँड आणि दिमापूर या जिल्ह्यांमध्ये आयएलपी लागू करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री नेफिऊ रिओ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे नागालँडचे रहिवासी नसलेल्या नागरिकांना या जिल्ह्यांमध्ये प्रवेशासाठी आयएलपी लागणार आहे. हा परवाना लागणाऱ्या नागरिकांची विभागवारी करण्यात आली आहे.