November 14, 2025 3:19 PM

views 118

घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलनफुगवट्याच्या दरात ऑक्टोबर महिन्यात घट

घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर ऑक्टोबर महिन्यात १ पूर्णांक २१ शतांश टक्क्यांपर्यंत घसरला. सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत त्यात १३ शतांश टक्क्यांची घट झाली. गेल्या महिन्यात अन्नपदार्थ, नैसर्गिक वायू, वीज, खनिज तेल आणि धातू उत्पादनाच्या किमतीत घट झाल्यामुळे महागाईचा दर वाढल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीत म्हटलं आहे.

January 14, 2025 3:11 PM

views 64

गेल्या डिसेंबरमध्ये चलनफुगवट्याच्या दरात २.३७ टक्क्यांनी वाढ

गेल्या डिसेंबरमधे देशात घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलनफुगवट्याच्या दरात २ पूर्णांक ३७ शतांश टक्क्यांनी वाढ झाली. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने आज प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीत म्हटलंय की अन्नधान्यांच्या  किमती काही अंशी घसरल्या मात्र कारखान्यात तयार होणारी उत्पादनं काहीशी महागली. त्यामुळं उद्योजकांना चांगला परतावा मिळाला आहे.