December 10, 2025 9:25 AM

views 60

इंडिगोच्या कंपनीच्या विमान उड्डाणातील संख्येत 10% कपात

इंडिगोच्या विमानसेवेत गेल्या आठवडाभरापासून निर्माण झालेल्या अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर कंपनीच्या विमान उड्डाणांच्या संख्येत 10 टक्के कपात करायचे आदेश नागरी विमान वाहतूक संचालनालयाने दिले आहेत.   ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कंपनीनं केलेल्या कामाची माहिती घेण्यासाठी इंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर एल्बर्स यांना काल पुन्हा एकदा मंत्रालयानं बोलावलं होतं. 6 डिसेंबरपर्यंत रद्द झालेल्या विमानांच्या तिकिटाची पूर्ण रक्कम प्रवाशांना परत दिल्याची, तसंच उर्वरित रक्कम आणि सामान परत करायची ...

December 8, 2025 8:19 PM

views 242

IndiGo: विमानांची तिकीटं रद्द, प्रवाशांचे ८२७ कोटी रुपये परत !

१ ते ७ डिसेंबर या कालावधीत विमानांची सुमारे ६ लाख तिकिटं रद्द झाली आहेत. या प्रवाशांचे ८२७ कोटी रुपये परत केल्याची माहिती इंडिगो या हवाई वाहतूक कंपनीनं दिली आहे. सोमवारी कंपनीनं सुमारे १८०० उड्डाणं केली आणि त्यातली ९१ टक्के वेळेवर होती, असं कंपनीनं दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. ९ हजार बॅगांपैकी साडे चार हजार बॅगा प्रवाशांच्या नियोजित पत्त्यावर पोहोचवण्यात आल्या असून उर्वरीत बॅगा पुढच्या ३६ तासांत परत केल्या जातील असं त्यात म्हटलं आहे.    विमान वाहतूक ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता असून याच्...

December 7, 2025 8:18 PM

views 64

इंडिगोच्या सेवेत सातत्यानं सुधारणा होत असल्याची नागरी विमानवाहतूक मंत्रालयाची ग्वाही

देशातल्या विमानसेवा व्यवस्थितपणे आणि पूर्ण क्षमतेनं कार्यरत असून इंडिगोच्या सेवेत सातत्यानं सुधारणा होत आहे, अशी ग्वाही नागरी विमानवाहतूक मंत्रालयानं आज दिली. विमानांची वेळापत्रकं पूर्वपदावर येत असल्याचंही मंत्रालयानं निवेदनाद्वारे सांगितलं. आज दिवसअखेरपर्यंत इंडिगोची उड्डाणं १ हजार ६५० पर्यंत पोहोचण्याची आशा आहे, असंही यात नमूद केलं आहे.    इंडिगोनं आज मुंबई आणि दिल्ली विमानतळावरून २२०पेक्षा जास्त उड्डाणं रद्द केली. मात्र,  लवकरच आपली सेवा पूर्ववत करायचे प्रयत्न सुरू असून पंधराशेहून जास्त ...