February 6, 2025 10:24 AM

views 49

अमेरिकेत अनधिकृत मार्गाने गेलेले 104 भारतीय मायदेशी परत

अमेरिकेत अनधिकृत मार्गाने गेलेल्या 104 भारतीयांना घेऊन अमेरिकन वायुदलाचं विमान काल अमृतसरमध्ये पोहोचलं. यामधील 30 जण पंजाबमधील असून इतर चंदिगड, हरियाणा, गुजरात, महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेशातील रहिवासी आहेत. कोणतेही अधिकृत कागदपत्र नसलेल्या या प्रवाशांची चौकशी आणि ओळखपरेड सध्या सुरु आहे. अमृतसरमधील अधिकारी आणि विमानतळ प्रशासानाच्या सहकार्यानं हे काम सुरु आहे.  

September 26, 2024 2:37 PM

views 97

हिजबुल्लाह आणि इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांनी लेबननमध्ये प्रवास न करण्याचं बैरुतमधल्या भारतीय दुतावासाचं आवाहन

हिजबुल्लाह आणि इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांनी लेबननमध्ये प्रवास न करण्याचं आवाहन बैरुतमधल्या भारतीय दुतावासाने केलं आहे. पश्चिम आशियाई देशात प्रवास करू नये आणि लेबनन तात्काळ सोडावं असंही भारतीय दुतावासाने म्हटलं आहे. ज्यांना तिथं राहणं आवश्यक आहे त्यांनी आवश्यकता नसेल तर बाहेर पडू नये असंही दुतावासाने म्हटलं आहे. दरम्यान, इस्रायलने लेबननमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात ५५८ जणांचा मृत्यू झाला असून अठराशे जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये ५० बालकांचा समावेश आहे.