January 20, 2026 8:45 PM

views 271

शेअर बाजारात मोठी घसरण

अमेरिकेकडून वारंवार दिली जाणारी आयात शुल्क वाढीची भिती,  कमकुवत होणारा रुपया यासारख्या कारणांमुळं देशातल्या शेअर बाजारात आज मोठी घसरण झाली.  दिवसअखेर सेन्सेक्स १ हजार ६६ अंकांनी घसरुन ८३ हजारांच्या खाली जाऊन ८२ हजार १८० अंकांवर बंद झाला. व्यवहारा दरम्यान हा निर्देशांक ८२ हजारांच्या पातळीखाली जाण्याचीही भिती निर्माण झाली होती. निफ्टी ३५३ अंकांची घट नोंदवून २५ हजार २३२ अंकांवर स्थिरावला. जागतिक बाजारपेठेतली घसरण, मोठ्या कंपन्यांच्या समभागांच्या घसरलेल्या किंमती यामुळंही बाजारात घसरण दिसून आली.  

March 22, 2025 8:39 PM

views 93

देशातल्या शेअर बाजारांनी या आठवड्यात नोंदवली गेल्या ४ वर्षातली सर्वोत्तम तेजी

देशातल्या शेअर बाजारांनी या आठवड्यात गेल्या ४ वर्षातली सर्वोत्तम तेजी नोंदवली. या कालावधीत सेन्सेक्स ३ हजारांहून अधिक तर निफ्टी साडे ९०० हून अधिक अंकांनी वधारला. टक्केवारीचा विचार करता ही सुमारे ४ टक्के वाढ आहे. निफ्टीनं फेब्रुवारी २०२१ नंतर पहिल्यांदा आणि सेन्सेक्सनं जुलै २०२२ नंतर पहिल्यांदा एकाच आठवड्यात एवढी मोठी तेजी नोंदवली आहे. डॉलरच्या तुलनेत बळकट होणारा रुपया, कमी दरात उपलब्ध असलेले समभाग, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचं पुनरागमन यासारख्या कारणांमुळं बाजारात तेजी दिसून येते आहे, असं व...

November 13, 2024 7:46 PM

views 79

देशातल्या शेअर बाजारात सलग पाचव्या सत्रात मोठी घसरण

देशातल्या शेअर बाजारांमधे आज सलग पाचव्या सत्रात घसरण कायम राहिली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समधे आज दिवसअखेर ९८४ अंकांची घसरण झाली. आणि तो ७७ हजार ६९१ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ३२४ अंकांची घसरण नोंदवत २३ हजार ५५९ अंकांवर बंद झाला.   सेन्सेक्स निर्देशांकातल्या ३० पैकी २७ कंपन्यांचे समभाग आज तोट्यात गेले. एनटीपीसी, टाटा मोटर्स आणि इन्फोसिस या तीनच कंपन्यांचे समभाग काहीसे तेजीत राहिले.

November 12, 2024 6:20 PM

views 84

देशातल्या शेअर बाजारात मोठी घसरण

देशातल्या शेअर बाजारात आज मोठी घसरण झाली. व्यवहार सुरू झाले तेव्हा तेजी असलेले शेअर बाजार नंतर घसरले आणि व्यवहार संपेपर्यंत ही घसरण वाढत गेली. त्यामुळं सेन्सेक्स ७८ हजारांच्या खाली आणि निफ्टी २४ हजारांच्या खाली बंद झाले. दिवसअखेर सेन्सेक्स ८२१ अंकांनी कोसळून ७८ हजार ६७५ अंकांवर बंद झाला. निफ्टी २५८ अंकांनी घसरुन २३ हजार ८८३ अंकांवर स्थिरावला.

November 7, 2024 6:58 PM

views 113

भारतीय शेअर बाजारात घसरण

शेअर बाजारातल्या कालच्या तेजीला आज लगाम बसला. अमेरिकेतल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूक निकालानंतर शेअर बाजारात काल तेजीचा जोर होता, मात्र गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतल्यामुळे आज तो ओसरला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज ८३६ अंकांनी घसरून ७९ हजार ५४२ अंकांवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २८५ अंकांची घसरण नोंदवून २४ हजार १९९ अंकांवर बंद झाला.