October 22, 2024 2:57 PM

views 52

भारतीय नौदलाच्या ‘आयएनएस सुवर्णा’ या युद्धनौकेची टांझानियामध्ये दार-ए-सलाम या बंदराला भेट

भारतीय नौदलाच्या ‘आयएनएस सुवर्णा’ या युद्धनौकेनं १९ ते २१ ऑक्टोबर दरम्यान, टांझानियामध्ये दार-ए-सलाम या बंदराला भेट दिली. आयएनएस सुवर्णा, सध्या एडनच्या आखातात सागरी चाचेगिरी विरोधी मोहिमेवर तैनात आहे.   आयएनएस सुवर्णाच्या दार-ए-सलाम बंदर भेटी दरम्यान भारत आणि टांझानियाच्या नौदलांनी परस्परांशी औपचारिक संवाद साधला, आणि संयुक्त कवायतींमध्ये भाग घेतला. शोध, जप्ती, नुकसान नियंत्रण आणि अग्निशमन कवायती, क्रीडा सहभाग, या उपक्रमांचा यात समावेश होता. भारत सरकारच्या, हिंद-प्रशांत महासागर क्षेत्रात सागरी सह...

October 21, 2024 3:08 PM

views 67

भारताचे नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश त्रिपाठी ४ दिवसांच्या यूएई दौऱ्यावर

भारत आणि संयुक्त अरब अमिराती या दोन्ही देशात संरक्षण सहकार्य बळकट करण्याच्या उद्देशाने भारताचे नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश त्रिपाठी आजपासून चार दिवसांच्या यूएई दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते यूएईचे नौदल प्रमुख रिअर ॲडमिरल पायलट सईद बिन हमदान अल नाह्यान आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करतील. या भेटीचं उद्दिष्ट सर्वच क्षेत्रातल्या व्यापक धोरणात्मक भागीदारीच्या अनुषंगाने संरक्षण सहकार्य वाढवणं आणि द्विपक्षीय सागरी संबंध दृढ करणं असं आहे.  

August 27, 2024 12:27 PM

views 80

शिवरायांचा पुतळा पुनर्स्थापित करण्यासाठी भारतीय नौदलाचं एक पथक रवाना

महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या राजकोट किल्ल्यावरला पुतळा कोसळण्याचं कारण शोधण्यासाठी आणि पुतळा पुनर्स्थापित करण्यासाठी एक पथक रवाना करण्यात आल्याची माहिती भारतीय नौदलानं एका निवेदनाद्वारे दिली आहे. या संदर्भात राज्य सरकार आणि तज्ज्ञांच्या सहकार्यानं काम सुरू असल्याचं नौदलानं म्हटलं आहे. राजकोट किल्ल्यावरला छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५ फुटांचा पुतळा काल कोसळला होता. त्यानंतर नौदलानं आज हे निवेदन जारी केलं.

July 29, 2024 7:50 PM

views 60

मुंबईची जिया राय ठरली जगातली सर्वात कमी वयाची दिव्यांग जलतरणपटू

मुंबईची जिया राय, इंग्लिश खाडी सर्वात कमी वेळात पार करणारी जगातली सर्वात कमी वयाची दिव्यांग जलतरणपटू ठरली आहे. जिया हिनं हे ३४ किलोमीटरचं अंतर २८ आणि २९ जुलैदरम्यान १७ तास, २५ मिनिटांमध्ये पार केलं.  

July 18, 2024 1:10 PM

views 83

INS तेग या भारतीय नौदलाच्या युद्धनौकेद्वारे ओमानजवळ समुद्रात बुडालेल्या टँकरवरील 8 भारतीयांची सुटका

ओमानच्या किनारपट्टीवर तेलाचा टँकर उलटल्यानंतर बेपत्ता झालेल्यांच्या शोध आणि बचावासाठी पाठवण्यात आलेल्या INS तेग या भारतीय नौदलाच्या युद्धनौकेनं 8 भारतीयांसह नऊ क्रू सदस्यांची सुटका केली आहे. एमव्ही प्रेस्टिज फाल्कनमध्ये या दुर्घटनाग्रस्त तेलाच्या टँकरवर 13 भारतीय आणि श्रीलंकेचे तीन असे एकंदर 16 कर्मचारी होते. उर्वरित कर्मचाऱ्यांचा शोध घेण्याचं काम सुरू आहे. तेग या युद्धनौकेसोबतच एक P-8I हे सागरी गस्ती विमान ओमानमध्ये शोध आणि बचाव कार्यासाठी तैनात करण्यात आलं आहे. आपण ओमानच्या अधिका-यांच्या सतत स...

July 17, 2024 2:48 PM

views 54

भारतीय नौदलाच्या विकसित भारत संकल्पनेवर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धेला प्रारंभ

भारतीय नौदलानं काल आपल्या (थिंकक्यू) THINQ2024 या राष्ट्रीय पातळीवरच्या महत्त्वाच्या प्रश्नमंजुषा स्पर्धेचा काल प्रारंभ केला. यावर्षीच्या स्पर्धेची मुख्य संकल्पना विकसित भारत अशी आहे. 2047 मध्ये स्वातंत्र्याला शंभर वर्षं पूर्ण होईपर्यंत देशाचं विकसित भारतात रुपांतर करण्याच्या केंद्र सरकारच्या ध्येयाशी सुसंगत अशी ही संकल्पना आहे.   इयत्ता 9 वी ते 12 वीच्या देशभरातील सर्व विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा खुली आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांचं सर्वंकष मूल्यमापन करण्यासाठी संमिश्र पद्धत...