November 5, 2024 7:26 PM

views 156

भारतीय लष्कराकडून येत्या २८ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर या कालावधीत भरती रॅलीचं आयोजन

अग्नीवीर योजने अंतर्गत, एप्रिल २०२४ मध्ये झालेल्या ऑनलाइन CEE चाचणीत निवड झालेल्या, महाराष्ट्रातल्या मुंबई शहर, मुंबई उपनगर, नाशिक, ठाणे, पालघर, रायगड, धुळे, आणि नंदुरबार या आठ जिल्ह्यांमधल्या उमेदवारांची निवड करण्यासाठी भारतीय लष्कराने येत्या २८ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर या कालावधीत विरारमधल्या जीवदानी मैदानावर भरती रॅली आयोजित केली आहे. भरती रॅलीचा हा दुसरा  टप्पा आहे.    एप्रिल २०२४ मध्ये  ऑनलाइन CEE चाचणीत निवड झालेले सर्व धार्मिक गुरु  असलेले उमेदवार देखील या रॅलीला उपस्थित राहतील. भरती र...

October 28, 2024 1:41 PM

views 46

जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कराच्या वाहनावर दहशतवाद्यांचा गोळीबार

जम्मू-काश्मीरच्या अखनूर भागात भारतीय लष्कराच्या वाहनावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. अखनूर भागातल्या बटाल परिसरात सुरक्षा दलांकडून शोधमोहीम राबवण्यात येत आहे. आकाशवाणी वार्ताहराने दिलेल्या वृत्तानुसार, खूर इथल्या बट्टल भागातल्या असन मंदिराजवळही सशस्त्र दहशतवादी असल्याची माहिती लष्कराला मिळाली आहे. त्यामुळे पोलीस आणि लष्कराच्या तुकड्यांनी या गावाला आणि लगतच्या भागाला वेढा घातला आहे. तसंच, सीमेपलिकडून घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांना निष्प्रभ करण्यासाठी मोहीम सुरू आहे. या भागात अधिक फौजफाटा रवाना झाल...

September 6, 2024 12:44 PM

views 76

आंध्रप्रदेशातल्या बुडामेरू कालव्यातील भगदाड पडल्यामुळे निर्माण झालेली पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी भारतीय लष्कर तैनात

आंध्र प्रदेशातल्या विजयवाडा इथल्या बुडामेरू कालव्याला भगदाड पडल्यामुळे निर्माण झालेली पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी भारतीय लष्कर तैनात करण्यात आले आहेत. राज्य सरकारने लष्कराकडे मदत मागितल्यानंतर लष्करी अभियंता कृती दलाच्या ४० अभियंत्यांना हवाई मार्गाने विजयवाडा इथं नेण्यात आलं आहे. सैन्याच्या अतिरिक्त तुकड्याही तैनातीसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. भगदाड बुजवण्यासाठी, पूरस्थितीचं निरीक्षण करण्यासाठी आणि पूरबाधित रहिवाशांचं स्थलांतर करण्यासाठी स्थानिक प्रशासन आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचा...

August 21, 2024 10:01 AM

views 113

माजी लष्करप्रमुख जनरल सुंदरराजन पद्मनाभन यांना श्रद्धांजली अर्पण

माजी लष्करप्रमुख जनरल सुंदरराजन पद्मनाभन यांना काल भारतीय लष्करातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. चेन्नई इथं काल त्यांच्या पार्थिव देहावर संपूर्ण लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अनेक आजी माजी लष्करी अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते. सहकारी आणि कनिष्ठ यांच्यात पॅडी या नावानं ओळखल्या जाणाऱ्या पद्मनाभन यांनी ४३ वर्षांपेक्षा जास्त काळ देशसेवा केली. २००० ते २०-०२ या काळात त्यांनी लष्करप्रमुख म्हणून काम केलं होतं.

August 17, 2024 2:57 PM

views 78

भारतीय हवाई दल आणि लष्कराची अतिदक्षता केंद्रात अत्यावश्यक सामान पोहोचवण्याची यशस्वी मोहीम

भारतीय हवाई दल आणि लष्करानं संयुक्तरीत्या जवळपास १५ हजार फूट उंचीवरच्या भागातल्या अतिदक्षता केंद्रात अत्यावश्यक सामान पोहोचवण्याची मोहीम यशस्वी केली आहे. दुर्घटनेचा फटका बसलेल्या भागांना मदत पोहोचवण्याबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विचारांनुसार ही मोहीम राबवल्याचं संरक्षण मंत्रालयानं सांगितलं. या मोहिमेदरम्यान भारतीय हवाई दलानं सुपर हरक्युलस या वाहतूक विमानाद्वारे हे अत्यावश्यक सामान अचूक पद्धतीनं अतिदक्षता केंद्रापर्यंत पोहोचवण्यात यश मिळवलं.