August 27, 2025 8:16 PM

views 48

निर्यात वाढवण्यासाठी ४० देशांमध्ये भारतीय वस्तूंचा प्रचार-प्रसार करायचा भारताचा निर्णय

भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर अतिरिक्त शुल्क लादण्याच्या अमेरिकेच्या निर्णयानंतर भारतानं ४० इतर देशांमध्ये भारतीय वस्तूंविषयी जनजागृती करायचा निर्णय घेतला आहे. ब्रिटन, स्पेन, फ्रान्स, जर्मनी, इटली, रशिया, कॅनडा, तुर्किये, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशांचा यात समावेश आहे. या देशांमध्ये व्यापार मेळावे, खरेदीदार-विक्रेते यांच्या बैठका, विभिन्न उद्योगांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या मोहिमा राबवल्या जाणार आहेत.   यासंदर्भात केंद्रीय वाणिज्य मंत्रालय या आठवड्यात निर्यातदारांची बैठक घेणार आहे. यात अधिकाध...

August 27, 2025 6:33 PM

views 59

गाझा हल्ल्यात पत्रकारांच्या मृत्यूवर भारताची निषेधार्ह प्रतिक्रिया

इस्रायलाने गाजामधील खान युनुस इथ केलेल्या हल्ल्यात पत्रकारांचे झालेले मृत्यू धक्कादायक आणि निषेधार्ह असल्याची प्रतिक्रिया भारताने दिली आहे. संघर्षात नागरिकांचे मृत्यू होणे निंदनीय असल्याची भूमिका भारत नेहमीच घेत आला आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.   हल्यात पत्रकारांचे मृत्यू झाल्याच्या घटनेची चौकशी सुरु असल्याचं इस्रायली अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

August 21, 2025 12:35 PM

views 47

फिजीचे प्रधानमंत्री तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर

फिजीचे प्रधानमंत्री सितीवेनी लिगामामदा राबुका रविवारी तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. ते सोमवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करतील असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. राबुका राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही भेट घेणार आहेत. दोन्ही देशातील संबंध अधिक बळकट करण्यासाठी राबुका यांचा दौरा महत्त्वाचा असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. 

August 19, 2025 7:41 PM

views 86

आशिया चषक टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा

आशिया चषक टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. या संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव असेल. शुभमन गिल याच्याकडे उपकर्णधार पदाची धुरा असेल. या संघात अभिषेक शर्मा, टिळक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन, हर्षित राणा, रिंकू सिंग यांचा समावेश आहे.   आशिया चषक स्पर्धा येत्या ९ ते २८ सप्टेंबर दरम्यान अबुधाबी आणि दुबई इथं होईल. भारताचा पहिला सामना १० सप्टेंबरला संयुक्त अरब अमिरातीबरोबर...

August 13, 2025 8:10 PM

views 65

अमेरिकनं लादलेल्या अतिरिक्त आयात शुल्काचा मर्यादित परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होईल – मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन

अमेरिकनं लादलेल्या अतिरिक्त आयात शुल्काचा मर्यादित परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होईल, तीन ते सहा महिन्यानंतर हे नुकसान भरून काढू असा विश्वास मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन यांनी आज व्यक्त केला. दागदागिने, कोळंबी आणि वस्त्रोद्योग क्षेत्राला सध्या या आयात शुल्काचा मोठा फटका बसतो आहे. पण सरकारला या नुकसानीची जाणीव आहे आणि या क्षेत्रातल्या उद्योगांशी सरकारनं चर्चा सुरू केली आहे, असं त्यांनी नमूद केलं. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात शुक्रवारी...

August 12, 2025 9:08 AM

views 46

पाकिस्तानच्या अण्वस्त्र धमकीचा भारताकडून निषेध

पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी दिलेल्या अण्वस्त्र धमकीचा भारतानं तीव्र शब्दांत निषेध केला आहे. अण्वस्त्राच्या कोणत्याही धमकीला भीक घालणार नाही असं भारतानं आधीच स्पष्ट केल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं. भारत आपल्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करणं यापुढेही सुरूच ठेवेल असं त्यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे.

August 10, 2025 2:39 PM

views 50

भारताला हवाई क्षेत्र वापरायला बंदी घातल्यापासून पाकिस्तानचं नुकसान

पाकिस्ताननं भारताला त्यांचं हवाई क्षेत्र वापरायला बंदी घातल्यापासून पाकिस्तानचं १२७ कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. पाकिस्तानच्या राष्ट्रीय असेम्ब्लीमध्ये गेल्या आठवड्यात ही माहिती देण्यात आली. पाकिस्ताननं २४ एप्रिल पासून त्यांचं हवाई क्षेत्र वापरायला भारताला प्रतिबंध केला आहे. भारतानं देखील अशाच प्रकारची बंदी घातली असून भारताचं सार्वभौमत्व आणि सुरक्षा यापुढे कोणतंही नुकसान मोठं असू शकत नाही, असं भारतानं म्हटलं आहे. 

August 5, 2025 11:06 AM

views 51

विमानवाहतूक क्षेत्रात भारताचा जगात पाचवा क्रमांक

भारतानं विमानवाहतूक क्षेत्रात जगात पाचवा क्रमांक मिळवला आहे. भारतात 2024 मध्ये एकंदर 24 कोटी 10 लाख प्रवाशांची नोंद झाली असून, मुंबई-दिल्ली ही विमानतळ जोडी जगातल्या सर्वांत व्यग्र विमानतळांच्या जोडीपैकी एक ठरली आहे.   आंतरराष्ट्रीय विमानतळ वाहतूक संघटना म्हणजे आयएटीएनं 2024 चा जागतिक विमानवाहतुकीबाबतचा आकडेवारी अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यातून ही आकडेवारी समोर आली आहे.   अमेरिका या यादीत सर्वोच्च स्थानावर असून, त्या देशात 87 कोटी साठ लाख प्रवाशांची नोंद झाली आहे. दुसऱ्या क्रमांकावर असल...

August 5, 2025 9:57 AM

views 57

रशियाकडून तेल आयातीबाबत भारताला लक्ष्य करणं अनुचित असल्याचं भारताचं स्पष्टीकरण

रशियाकडून तेल आयातीबाबत अमेरिका आणि युरोपीय महासंघानं भारताला लक्ष्य करणं अनुचित आणि तर्कहीन असल्याचं भारतानं म्हटलं आहे. कोणत्याही महत्त्वाच्या अर्थव्यवस्थांसारखांच भारतही आपल्या राष्ट्रीय हिताचं आणि आर्थिक स्थैर्याचं संरक्षण करेल, असं ठाम प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं केलं आहे. रशिया आणि युक्रेन संघर्षानंतर सर्व पारंपरिक पुरवठा युरोपाकडे वळल्यामुळे भारतानं रशियाकडून कच्चं तेल आयात करणं सुरू केल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे. त्या वेळी अमेरिकेनंच अशा आय...

August 3, 2025 7:31 PM

views 40

फिलीपिन्सचे राष्ट्राध्यक्ष पाच दिवसांच्या भारत दौऱ्यावर

फिलीपिन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांद आर मार्कोस ज्युनियर पाच दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. नवी दिल्लीत उद्या दुपारी त्यांचं आगमन होईल. त्यांच्या पत्नी लुईस अरानेता मार्कोस आणि कॅबिनेट मंत्र्यांचं शिष्टमंडळ त्यांच्यासोबत असेल. या दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मार्कोस यांच्यात द्विपक्षीय चर्चा होईल. तसंच राष्ट्राध्यक्ष मार्कोस राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही भेट घेतील. फिलीपिन्सला परतण्याआधी मार्कोस बंगळुरूला भेट देणार आहेत.