May 18, 2025 8:39 PM

views 66

दहशतवादाविरोधात भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी ७ सर्वपक्षीय प्रतिनिधी मंडळं जाहीर

दहशतवादाविरोधात भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, सात सर्वपक्षीय प्रतिनिधिमंडळं लवकरच वेगवेगळ्या देशांना भेट देणार आहेत. या संदर्भात, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी या शिष्टमंडळांचं नेतृत्व करणाऱ्या खासदारांची आणि सदस्यांची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार, भाजपा खासदार बैजयंत पांडा यांच्या नेतृत्वाखालचा गट सौदी अरेबिया, बहरीन, कुवेत आणि अल्जेरियाला भेट देईल.   भाजपा खासदार रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वाखालचा गट यूके, फ्रान्स, जर्मनी, युरोपियन युनियन, इटली आणि ...

February 22, 2025 1:49 PM

views 75

शस्त्रबंदी कायम ठेवण्यावर भारत आणि पाकिस्तान यांच्यात सहमती

शस्त्रबंदी कायम ठेवणं आणि भविष्यात गैरसमज टाळण्यावर भारत आणि पाकिस्तान यांच्यात सहमती झाली आहे. जम्मू - काश्मिरातल्या पूंछमध्ये दोन्ही देशांच्या ब्रिगेड कमांडरच्या बैठकीत ही चर्चा झाली. सुमारे ४ वर्षांनंतर अशा प्रकारची बैठक झाली.   नुकतीच झालेली चकमक आणि ताबारेषेवर आढळून आलेल्या बॉम्बची पार्श्वभूमी या बैठकीला होती. दोन्ही देशातला तणाव कमी करण्यासाठी विद्यमान संपर्क यंत्रणांचा प्रभावी वापर करण्याचा निर्णयही दोन्ही देशांनी घेतला.