December 8, 2025 9:50 AM

views 34

भारत आणि युरोपियन संघांदरम्यान आज नवी दिल्लीत मुक्त व्यापार करारावर पुन्हा चर्चा सुरू होणार

भारत आणि युरोपियन संघांदरम्यान आज नवी दिल्लीत मुक्त व्यापार करार अर्थआत एफटीए वर चर्चा पुन्हा सुरू होणार आहे. दोन दिवसांच्या या संयुक्त सत्रादरम्यान युरोपिअन संघटना आणि भारत यांच्यातील मजबूत आर्थिक संबंध दृढ करण्याच्या दीर्घकालीन प्रयत्नात आणखी एक पाऊल असेल. भारतातील युरोपिअन संघटनेचे राजदूत हर्वे डेल्फिन यांनी ईयू-भारत एफटीए चर्चेचा हा दुसरा टप्पा असल्याचं म्हटलं आहे.