October 13, 2025 7:18 PM

views 149

नैऋत्य मौसमी पावसाची राज्यातून पूर्णपणे माघार

नैऋत्य मौसमी पावसानं राज्यातून पूर्णपणे माघार घेतली असल्याचं हवामान विभागानं जाहीर केलंय. राज्यातला मान्सूनचा माघारीचा प्रवास आज पूर्ण झाला. आता केवळ दक्षिण भारत आणि ओडिशातून मान्सूनची माघार शिल्लक आहे.    येत्या दोन दिवसात राज्याच्या चारही विभागांमधे तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात तुरळक ठिकाणी ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. 

October 5, 2025 3:30 PM

views 220

शक्ती चक्रीवादळाच्या प्रभावामुळे देशात मुसळधार पाऊस

ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या शक्ती या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून पुढच्या काही दिवसात ते अधिक शक्तिशाली होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे. ७ ऑक्टोबरपर्यंत उत्तर कोकण किनारपट्टी भागात जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. समुद्रात सध्या १०० किमी प्रतितास वेगाने वारे वाहत असल्याने मच्छिमारांनी ७ ऑक्टोबरपर्यंत समुद्रात जाऊ नये असा इशारा दिल...

October 4, 2025 8:11 PM

views 484

ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेलं शक्ती चक्रीवादळ शक्तिशाली होण्याची शक्यता

ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या शक्ती या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून पुढच्या काही दिवसात ते अधिक शक्तिशाली होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या चक्रीवादळाचा संभाव्य परिणाम दक्षिण महाराष्ट्र किनारपट्टीवर होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. या दरम्यान, समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता असल्यामुळे पुढचे काही दिवस मच्छिमारांनी समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे.

September 30, 2025 6:51 PM

views 112

नैऋत्य मौसमी पावसाचा राज्यातला परतीचा प्रवास…

नैऋत्य मौसमी पावसाचा राज्यातला परतीचा प्रवास येत्या काही दिवसात सुरू होईल. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजपर्यंत गुजरातच्या बहुतांश भागातून हा पाऊस परतला आहे. त्यानंतर ५ ऑक्टोबरपर्यंत उत्तर महाराष्ट्रातून तर १० ऑक्टोबरपर्यंत राज्याच्या बहुतांश भागातून मान्सून परत जाईल. ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत संपूर्ण देशातून मान्सून माघारीचा प्रवास प्रवास पूर्ण होईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

July 28, 2025 6:58 PM

views 94

राज्यात संपूर्ण आठवडाभर पावसाची शक्यता – हवामान विभाग

नाशिकमध्ये घाट परिसरांत गेल्या दोन दिवसांत पावसाचा जोर वाढल्यानं गंगापूर धरण ७३ टक्क्यांपेक्षा जास्त भरलं आहे. आज सकाळी ११ वाजता गंगापूर धरणातून ६०३ क्युसेकचा विसर्ग गोदावरीत सोडण्यात आला. जिल्ह्यात इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, दिंडोरी, कळवण, बागलाण या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे.   धुळे जिल्ह्यातही दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे पांझरा, मालनगाव आणि जामखेडी हे मध्यम प्रकल्प पूर्ण भरले असून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तिथून पांझरा नदीवरच्या अक्कलपाडा धरणात मोठ्या प्रम...

July 15, 2025 3:33 PM

views 73

महाराष्ट्रात पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत

राज्याच्या विविध भागात आज सकाळपासून पावसानं जोर धरला असून अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासून दमदार पावसानं हजेरी लावली.    रत्नागिरीच्या खेड तालुक्यात मुंबई-गोवा महामार्गावर कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कशेडी घाटात दरड कोसळून वाहतूक कोंडी झाली असून, सध्या वाहतूक एकेरी मार्गावरून सुरू आहे. तसंच  दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. रत्नागिरी तालुक्यात गेल्या २४ तासांत  १४३ पूर्णांक ११ मिलिमीटर पावसाची नोंद  झाली. जगबुडी, शास्त्री आणि कोदवली य...

July 14, 2025 2:25 PM

views 81

देशभरात विविध ठिकाणी पावसाची शक्यता

राजस्थान, पश्चिम बंगाल, गुजरात, झारखंड, ओदिशा आणि मध्य प्रदेशाच्या पश्चिम भागात आज अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे.    दिल्लीचा काही भाग,चंदीगड, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मिर, कर्नाटकचा समुद्रकिनारी भाग, अंदमान-निकोबार द्वीपसमूह आणि पूर्वेकडील राज्यांत पुढील दोन ते तीन दिवस  मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.   मध्य प्रदेशाच्या काही भागात, बिहार, झारखंड, ओदिशा, सिक्कीम, तेलंगणा, उत्तराखंड आणि राजस्थानच्या पश्चिमकेडील भागात आज मेघगर...

July 1, 2025 9:27 AM

views 88

जुलै महिन्यात संपूर्ण देशभरात पावसाचं प्रमाण मासिक सरासरीपेक्षा जास्त असेल- IMD

जुलै महिन्यात संपूर्ण देशभरात पावसाचं प्रमाण मासिक सरासरीपेक्षा जास्त असेल आणि दीर्घकालीन सरासरीच्या १०६ टक्क्यांहून जास्त असेल असा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवला आहे.    देशातील बहुतेक भागात सामान्य ते मध्यम प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. परंतु ईशान्य आणि पूर्वेकडील बहुतेक भाग, दक्षिणेकडील द्वीपकल्पीय भाग आणि वायव्य भारतातील काही भागात या वर्षी जुलै महिन्यात सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे अशी माहिती IMD चे महासंचालक मृत्युंजय मोहापात्रा यांनी काल दूरस्थ पद्धतीनं आयोजित  पत...

June 15, 2025 6:12 PM

views 89

विदर्भ, गुजरात, छत्तीसगढ आणि ओदिशात नैऋत्य मोसमी पावसाची वाटचाल सुरु

विदर्भ, गुजराथचा काही भाग, छत्तीसगढ आणि ओदिशा इथे नैऋत्य मोसमी पावसाची वाटचाल सुरु आहे. उत्तर भारतात उत्तराखंड,हरयाणा, पश्चिम उत्तर प्रदेश, मध्य राजस्थानमध्ये आज तर मध्यप्रदेशचा पूर्व भाग, छत्तीसगढ, विदर्भ, पश्चिम बंगाल, सिक्किम, बिहार,झारखंड आणि ओदिशा इथे या महिन्याच्या वीस तारखेपर्यंत जोरदार पावसाची शक्यता आहे असा अंदाज भारतीय हवामानखात्याने वर्तवला आहे. इशान्य भारतात पुढील तीन दिवस कमाल तापमानात ३ ते ४ अंश सेल्सिअसची घट होईल असंही विभागाने म्हटलं आहे.

June 7, 2025 3:13 PM

views 93

हवामान विभागाकडून मुंबई आणि रायगडमध्ये रेड तर पुण्यासाठी ऑरेंज अलर्ट

हवामान विभागानं मुंबई आणि रायगड जिल्ह्यासाठी आज संध्याकाळी ५ वाजेपर्यंत रेड अलर्ट, तर पुण्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.    येत्या दोन दिवसांत पालघर, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि दक्षिण महाराष्ट्राचा काही भाग वगळता संपूर्ण राज्यात मुसळधार पावसाची शक्यता असून, हवामान विभागानं या ठिकाणी यलो अलर्ट जारी केला आहे.   सांगली जिल्ह्यात मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ, पलूस आणि वाळवा तालुक्यात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडत आहे. पावसामुळे सांगलीमधल्या आठवडी बाजारात आज भाजीपाला विक्रेत्यांची आणि नागरिकांची गैरस...