November 21, 2024 3:28 PM

views 35

इफ्फी चित्रपट महोत्सवात चित्रपट प्रेमींना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चित्रपटांची पर्वणी

गोव्यात ५५वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मोठ्या उत्साहात सुरु असून आज दिवसभरात विविध विषयांवरचे ४० चित्रपट दाखवण्यात येत आहेत. यामध्ये उत्तमोत्तम हिंदी आणि प्रादेशिक चित्रपट दाखवण्यात येत आहेत. इफ्फीमधील इंडियन पॅनोरमा या दालनाचेही उद्घाटन झाले असून यात २५ फिचर आणि २० नॉन फिचर चित्रपट दाखवण्यात येत आहेत. महोत्सवात चित्रपटांच्या प्रदर्शनाबरोबरच इतरही कार्यक्रम सुरु आहेत. जगभरातील चित्रपट कर्मी त्यांच्या मास्टरक्लासच्या माध्यमातून  तरुणांना विविध विषयांवर मार्गदर्शन करत आहेत. चित्रपट निर्...

November 19, 2024 2:47 PM

views 36

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव उद्यापासून गोव्यात

इफ्फी अर्थात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला उद्यापासून गोव्यात सुरुवात होत आहे. या महोत्सवात ८१ देशांमधले एकूण १८० चित्रपट प्रदर्शित केले जातील. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल वार्ताहर परिषदेत या महोत्सवाच्य़ा आयोजनाबाबत माहिती दिली. महोत्सवस्थळी जाण्यासाठी विनाशुल्क वाहन व्यवस्था तसंच चोख सुरक्षा व्यवस्था असल्याचं त्यांनी नमूद केलं. जागतिक चित्रपटाच्या दुनियेतले आगळेवेगळे स्वर आणि नवोन्मेषशाली कथन अधोरेखित करणाऱ्या इफ्फी या महोत्सवाचं हे पंच्चावन्नावं वर्ष आहे. इफ्फी हा जागतिक सिन...

November 15, 2024 8:12 PM

views 52

इफ्फी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी पुरस्कार दिला जाणार

जगभरातल्या नवोदित चित्रपटकर्मींच्या असामान्य योगदानाची दखल घेण्यासाठी ५५ व्या इफ्फी या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवात पदार्पणातल्या सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी पुरस्कार दिला जाणार आहे. १० लाख रूपये रोख, चांदीचा मोर आणि सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. या श्रेणीसाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. जिप्सी हा शशि चंद्रकांत खंदारे यांचा मराठी चित्रपट आणि तेलगु लेखक दिग्दर्शक इमानी व्ही एस नंद किशोर यांचा ३५ छिन्ना कथा काडू या चित्रपटांचा त्यात समाव...

November 13, 2024 8:20 PM

views 61

IFFI मध्ये सुवर्ण मयुर पुरस्कारासाठी १५ चित्रपटांमध्ये स्पर्धा

जगभरातल्या सर्वोत्तम कथानक मांडणाऱ्या चित्रपटाला दिल्या जाणाऱ्या सुवर्ण मयूर पूरस्कारसाठी IFFI अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात १५ चित्रपट एकमेकांना टक्कर देणार आहेत.  यामध्ये भारताच्या, द गोट लाईफ या मल्याळम भाषेतल्या, आर्टिकल ३७० या हिंदी आणि रावसाहेब या मराठी चित्रपटांचा समावेश आहे.   रावसाहेब या मराठी चित्रपटात जितेंद्र जोशी मुख्य भूमिकेत असून राष्ट्रपती पुरस्कार विजेते निखिल महाजन यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 

November 11, 2024 3:56 PM

views 46

सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार ऑस्ट्रेलियन चित्रपट निर्माते फिलिप नोईस यांना जाहीर

इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यंदाचा सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार ऑस्ट्रेलियन चित्रपट निर्माते फिलिप नोईस यांना दिला जाणार आहे. माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू यांनी नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. गोव्यात २० नोव्हेंबरपासून हा महोत्सव सुरू होणार असून २८ नोव्हेंबरपर्यंत सुरू असेल. ऑस्ट्रेलिया या वेळेचा ‘फोकस कंट्री ऑफ द इयर’ आहे. या महोत्सवासाठी १०१ देशांतून १ हजार ६७६ प्रवेशिका आल्या होत्या. त्यापैकी ८१ देशातले १८० चित्रपट महोत्सवात दाखवले जाणार असल्याची माहि...

November 4, 2024 8:21 PM

views 65

५५व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात नवोदित दिग्दर्शकाचे पदार्पणातले चित्रपट अशी नवी श्रेणी सुरु

५५व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात नवोदित दिग्दर्शकाचे पदार्पणातले चित्रपट अशी नवी श्रेणी सुरु होत आहे. येत्या २० ते २८ नोव्हेंबर दरम्यान  गोव्या होणाऱ्या इफ्फी महोत्सवात या श्रेणीत प्रदर्शित करण्यासाठी ५ चित्रपटांची निवड झाली आहे. त्यात नवज्योत बांदिवडेकर दिग्दर्शित “घरत गणपती” चित्रपटाचा समावेश आहे. या खेरीज मणिपुरी, कन्नड, तेलगु, आणि मल्ल्याळम भाषेतले चित्रपट या श्रेणीत दाखवले जातील.