September 19, 2025 4:05 PM

views 70

हैदराबाद गॅझेटियरबाबतच्या निर्णयामुळे ओबीसी समाजात अस्वस्थता वाढत असल्याचा काँग्रेसचा आरोप

हैदराबाद गॅझेटियरबाबतच्या शासन निर्णयामुळे ओबीसी समाजात अस्वस्थता वाढत असल्याचा आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. या प्रश्नावर सरकारने बैठक बोलवावी, ओबीसी आरक्षणाला धक्का लागला आहे याचे पुरावे आम्ही देऊ, असं त्यांनी सांगितलं. ओबीसी उपसमितीचे सदस्य असलेले ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ आणि पंकजा मुंडे बाहेर एक भूमिका मांडत आहे तीच भूमिका त्यांनी बैठकीत मांडावी, असंही वडेट्टीवार यावेळी म्हणाले.

September 18, 2025 7:17 PM

views 81

Bombay High Court: हैदराबाद गॅझेट विषयक निर्णयाला आव्हान देणारी जनहित याचिका फेटाळली

मराठा समाजाच्या नागरिकांना इतर मागासवर्गीय प्रवर्गांतर्गत कुणबी जातीचं प्रमाणपत्र देण्याच्या हैदराबाद गॅझेट विषयक शासन निर्णयाला आव्हान देणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयानं आज फेटाळली. याच मुद्द्यावरची रीट याचिका आधीच न्यायालयासमोर प्रलंबित असल्याचं मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठानं नमूद केलं आणि एकाच विषयावरच्या अनेक याचिका दाखल करून घेता येणार नाहीत, असं सांगत याचिका फेटाळून लावली.